श्री सिध्दराज अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीची समतास सदिच्छा भेट
संपादक , ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे
श्री सिध्दराज अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीची समतास सदिच्छा भेट
कोपरगाव – समता पतसंस्थेच्या विभागांची माहिती घेतल्यानंतर पेपरलेस बँकिंग प्रणाली विशेष महत्वाची वाटली या प्रणाली अंतर्गत व्हॉवचेरलेस पद्धतीने केला जाणारा सुरक्षित व्यवहार आणि ग्राहकाच्या अमूल्य वेळेची बचत हे ग्राहक हिताचे आहे तसेच मिटिंग रूम ची संरचना विशेष प्रभावी वाटली त्यातील मिटींग रूममधील संचालकांची आणि सेवकांची प्रार्थना तसेच ग्राहकांविषयी असणारा आदर कौतुकास्पद आहे’. असे प्रतिपादन श्री सिध्दराज अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भारत मुळे यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेस ३ सप्टेंबर २०२१ रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील श्री सिध्दराज अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भारत मुळे, शाखा व्यवस्थापक श्री वैजनाथ मोरे,श्री पवन कोल्हे,श्री सचिन मुळे आदी पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.त्या प्रसंगी ते बोलत होते.

उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश देशमाने(कर्ज विभाग), श्री योगेश आसने (ई.डी.पी.),बोर्ड सेक्रेटरी श्री संतोष मुदबखे, कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री आप्पासाहेब कोल्हे यांनी यथोचित सत्कार केला.
त्यानंतर कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी कोल्हे यांनी मुख्य कार्यालय आणि शाखेतील कामकाजाची सविस्तर माहिती दिली.उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या प्रत्येक विभागाची माहिती घेतल्यानंतर दिलेली अनमोल माहिती आणि बहुमोल वेळ दिल्याबद्दल समताच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.