श्री.कांतीलाल हरलाल जोशी यांच्या हस्ते समता पाणपोईचे उद्घाटन – काका कोयटे
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
श्री.कांतीलाल हरलाल जोशी यांच्या हस्ते समता पाणपोईचे उद्घाटन – काका कोयटे
समता पाणपोईचे उद्घाटन करताना श्री.कांतीलाल हरलाल जोशी व आगारप्रमुख श्री.अमोल बनकर. समवेत समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे, संचालक श्री.गुलशन होडे व इतर मान्यवर.
कोपरगाव : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने आपल्या जवळ सतत पाणी असणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात प्रवास करत असताना तहान लागल्यानंतर बस एखाद्या आगारात थांबल्यास पाणी पिऊन येईपर्यंत जागा जाऊ शकते किंवा आपली एखादी वस्तू चोरीला जाऊ शकते.या भीतीमुळे बसमधील प्रवासी खाली उतरून पाणी पिऊ शकत नाही.त्यामुळे प्रवाशांची हाल होऊ नये. यासाठी समता चॅरिटेबल ट्रस्ट समता पतसंस्था आणि समता इंटरनॅशनल स्कूल यांच्या सौजन्याने कोपरगाव आगारातील प्रवाशांसाठी गेल्या ५ वर्षापासून पाणपोईच्या माध्यमातून समाजसेवा करत आली आहे.आज ही कोपरगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध गुळाचे व्यापारी व समता पतसंस्थेचे संचालक श्री.कांतीलाल हरलाल जोशी यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले असून कोपरगाव आगारात येणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये जागेवर जाऊन पिण्यासाठी स्वच्छ पाणी देणार आहोत. तसेच कोपरगाव आगारात वृक्षारोपण करून कोपरगाव आगाराचे सुशोभिकरण करण्याचा मानस असल्याचे समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे व समता पतसंस्थेचे संचालक श्री.कांतीलाल जोशी यांच्याशी सुशोभिकरणाबाबत चर्चा करताना आगाराचे अधिकारी व कर्मचारी.
प्रसंगी कोपरगाव आगार प्रमुख श्री. अमोल बनकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की , काकासाहेब कोयटे यांनी समताच्या माध्यमातून कोपरगाव आगारातच नाही तर, कोपरगाव शहरातही अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले आहे. त्यांचे सर्व सामाजिक उपक्रम हे कोपरगावकरांच्या हिताचे व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे समताचे सर्वच शैक्षणिक, सामाजिक उपक्रम हे विशेष उल्लेखनीय असून समाजाला दिशादर्शक आहे.
कोपरगाव आगाराच्या वतीने समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे, समता पतसंस्थेचे संचालक व कोपरगाव शहरातील गुळाचे व्यापारी श्री.कांतीलाल जोशी, श्री.गुलशन होडे यांच्या सत्कार आगार प्रमुख श्री. अमोल बनकर यांच्या हस्ते करण्यात आला तर समता पतसंस्थेच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात आगाराचे प्रमुख श्री.अमोल बनकर यांचा सत्कार जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच काका कोयटे यांना कोपरगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडून प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने आगारात गप्पी मासे ठेवण्यात आले असून त्या माशांविषयी माहिती दिली.
गप्पी माशांविषयी माहिती घेताना समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोपरगाव आगार वाहतूक नियंत्रक श्री. गंगाधर सानप यांनी केले. या वेळी समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे, समता पतसंस्थेचे संचालक श्री.कांतीलाल जोशी, श्री.गुलशन होडे, श्री.हर्षल जोशी, आगार प्रमुख श्री.अमोल बनकर, श्री.हर्षल जोशी, वाहतूक नियंत्रक श्री.गंगाधर सानप, श्री.आशिष कांबळे, श्री.पंकज विसपुते, श्री.अविनाश गायकवाड, श्री.विनोद रोहोम, श्री.औदुंबर श्रीगादी, श्री.तुळशीराम पवार, श्री.राजेंद्र नेहे, श्री.गोपीनाथ कवरे, श्री.मुकुंद बिडवे, श्री.नवनाथ बढे, समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड, मुख्य कार्यालयातील अधिकारी, शाखाधिकारी श्री.आप्पा कोल्हे, कोपरगाव आगारातील कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार समता पतसंस्थेचे श्री.संजय पारखे यांनी मानले.