समताच्या शिर्डी शाखेच्या ठेवीत गत तीन महिन्यात तब्बल चार कोटी एकाहत्तर लाख रुपयांची वार्षिक सत्तर टक्के विक्रमी वाढ करून महाराष्ट्रातील पतसंस्थांना ही दिशादर्शक – श्री. सतीश जेजुरकर , शाखाधिकारी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताच्या शिर्डी शाखेच्या ठेवीत गत ३ महिन्यात तब्बल ४ कोटी ७१ लाख रुपयांची वार्षिक ७० टक्के विक्रमी वाढ करून महाराष्ट्रातील पतसंस्थांना ही दिशादर्शक – श्री.सतीश जेजूरकर
शिर्डी शाखेचे छायाचित्र.
शिर्डी : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिर्डी शाखेच्या ठेवी ३१ मार्च २०२३ रोजी २६ कोटी ९२ लाख इतक्या होत्या. गत तीन महिन्यात या ठेवीमध्ये तब्बल ४ कोटी ७१लाख इतक्या रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी ३१ कोटी ६२ लाख रुपयांच्या झालेल्या आहेत. वार्षिक वाढीचे प्रमाण ६९.९६ टक्के इतके पडले आहे.शिर्डी शाखेची झालेली वाढ ही महाराष्ट्रातील इतर पतसंस्थांना ही आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने दिशादर्शक असल्याचे शिर्डी शाखेचे शाखाधिकारी श्री.सतीश जेजुरकर यांनी सांगितले.
सहकारी संस्था तसेच खाजगी कंपन्या देखील दरवर्षी ३१ मार्च रोजी गत वर्षात आपण केलेली आर्थिक कामगिरी जाहीर करीत असतात. ही आकडेवारी जाहीर करतांना ३० सप्टेंबर पर्यंत हे आर्थिक ताळेबंद जाहीर करणेचे बंधन महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांना आहे. परंतु समता नागरी सहकारी पतसंस्थेने आपले सर्व आर्थिक वर्षाचे ताळेबंद ३१ मार्च रोजीच जाहीर करणेची परपंरा गेली ३७ वर्षे राखलेली आहे. यापुढे जाऊन तर तिमाहीची आकडेवारी देखील समता पतसंस्था प्रत्येक तिमाही नंतर जाहीर करत या परंपरेला अजुनही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. ३१ मार्च २०२३ नंतर केलेल्या तिमाही आर्थिक प्रगतीचा अहवाल समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे यांनी संचालक मंडळाचे वतीने ३० जून २०२३ रोजीच प्रसिद्ध केला आहे.
समता पतसंस्थेची वैधानिक तरलतेची रक्कम २८८ कोटी इतकी असून सहकार खातेचे नियमाप्रमाणे वैधानिक तरलतेची टक्केवारी २५ टक्के राखणे बंधनकारक असताना देखील समता नागरी सहकारी पतसंस्थेने ३४.१५ टक्के इतके प्रमाण राखून ठेवीदाराची सुरक्षितता जपली आहे. तसेच समता पतसंस्थेच्या समता लिक्वीडीटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.७१ टक्के इतके ठेवीदारांच्या २७ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत.
कर्ज वाटपात देखील शिर्डी शाखेची वाढ कायम राहीली असुन ३१ मार्च २०२३ रोजी ८ कोटी ४६ लाख इतके कर्ज वाटप होते. त्यात देखील ३८ लाख रुपयाची वाढ झाली आहे. वार्षिक कर्ज वाढीचा वेग ४.४९ टक्के इतका आहे.
या कर्ज वाटपापैकी जगभरात सर्वात सुरक्षित समजले जाणा-या केवळ सोनेतारणाच्या सिक्युरिटीवर दिलेले शिर्डी शाखेचे कर्ज ७ कोटी ४७ लाख इतके असून सोने तारण कर्जाचे एकूण तारणी कर्जाशी प्रमाण ८४.५० टक्के इतके पडले आहे.
वरील आर्थिक परिस्थितीचा विचार करता शिर्डी शाखेने संस्थेच्या आर्थिक प्रगतीत भर घातली असून वैधानिक तरलतेची गुंतवणूक व जगभरात सर्वात सुरक्षित समजले जाणारे सोने तारण कर्जाचे वाटप तसेच मुदत ठेवीचे तारणावर दिलेल्या कर्जाचे वाटप व संस्थेची कायम मालमत्ता १३ कोटी ६८ लाख रुपयांची झाली आहे.
नुकत्याच झालेल्या रु.२,०००/- नोटबंदी नंतर शिर्डी शाखेने मारलेली ही भरारी समता पतसंस्थेचे मार्गदर्शक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचेवरील व सर्व संचालक मंडळावरील विश्वासाचे प्रतिक असलेचे संस्थेचे शाखाधिकारी श्री. सतीश जेजुरकर यांनी सांगितले. तसेच शिर्डी शाखेच्या घोडदौडीमध्ये जेष्ठ संचालक जितुभाई शहा, गुलाबशेठ अग्रवाल, अरविंदभाई पटेल, चांगदेव शिरोडे, रामचंद्र बागरेचा, कांतीलाल जोशी, संदीप कोयटे, गुलशन होडे, निरव रावलीया, कचरू मोकळ तसेच महिला संचालिका श्वेताताई अजमेरे, शोभाताई दरक, सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांचे सहकार्य असल्याचे देखील शाखाधिकारी श्री.सतीश जेजुरकर यांनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे माध्यमातून शिर्डी शाखेने अतिशय कमी कर्मचा-यांचे माध्यमातुन ही प्रगती साध्य केली आहे. याबाबत अधिक माहिती देतांना कांचन दंडवते म्हणाल्या की, ३१ मार्च २०२३ रोजी शिर्डी शाखेतील कर्मचा-यांची संख्या ७ इतकी होती. याच कर्मचारी संख्येच्या आधारावर ३१ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२३ या दोन वर्षात तब्बल १५ कोटी ६२ लाख रुपयांच्या ठेवी वाढविल्या असून त्यांचे प्रमाण ९७.५१ टक्के इतके आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केल्याने कमीत-कमी कर्मचा-यांमध्ये जास्तीत जास्त व्यवसाय करणे शक्य झाल्याने शिर्डी शाखेचे अधिकारी श्री. सतीश जेजुरकर यांनी सांगितले.
या यशाबददल शिर्डी शाखेच्या कर्मचारी वर्गावर १० ते २० टक्के पगारवाढ करण्यात आल्याचे व्यवस्थापनाच्यावतीने जाहीर करण्यात आले. कर्मचा-यांना बोनस, ग्रॅज्युएटी कर्मचारी व कुटुंबाकरिता रु. १ लाख पर्यंत मेडीक्लेम इन्शुरन्स, आधार पेन्शन योजना, ०% व्याजदाराने घर विकत घेण्यासाठी, बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कर्ज तसेच ०% व्याजदाराने वाहन तारण कर्ज, त्याचप्रमाणे कर्मचा-यांना सवलतीचे दरात समता इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षण, समता पेन्शन योजनेचा लाभ मिळत असल्याचे श्री. शशिकांत सोनवणे यांनी सांगितले.