मलकापूर अर्बन बँकेत पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी आणि एकूणच पतसंस्थांच्या कल्याणासाठी देह त्याग करावा लागला तरी चालेल – काकासाहेब कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
मलकापूर अर्बन बँकेत पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी आणि एकूणच पतसंस्थांच्या कल्याणासाठी देह त्याग करावा लागला तरी चालेल – काकासाहेब कोयटे, अध्यक्ष
कोपरगाव : मलकापूर अर्बन बँकेवर २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सेक्शन 35 / A ची बंधने रिझर्क बैंक ऑफ इंडियाने लादल्यामुळे या बँकेतील लाखो वैयक्तिक ठेवीदारांच्या आणि १७५ नागरी सहकारी पतसंस्थांच्या ३०० कोटी इतक्या रुपयांच्या ठेवी अडकलेल्या असल्याने बुलढाणा आणि मराठवाड्यातील पतसंस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. या पतसंस्थांच्या लाखो सभासदांच्या ठेवी अडचणीत आलेल्या या सभासदांच्या मनात भीती निर्माण झालेली असून अनेक सभासदांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
याबाबत राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आणि संघर्ष समितीने २० मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे केलेल्या आंदोलन प्रसंगी श्री.चैनसुख संचेती यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे मी तुम्हाला घेवून जाईन व मलकापूर बँकेतील ठेवीदारांच्या ३० टक्के ठेवी परत करण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेला मागितली आहे, असे सांगतात. परंतु या संबंधातील रिझर्व्ह बँकेचा पत्रव्यवहार दाखवत नाहीत. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही ते आंदोलन तात्पुरते स्थगित केलेले होते. परंतु त्यानंतर दिड ते दोन महिने उलटून देखील श्री.चैनसुख संचेती यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही किंवा आम्ही साधित असलेल्या संपर्काला प्रतिसाद देखील दिलेला नाही. त्यामुळे आम्ही आता पुन्हा स्थगित केलेले आंदोलन सुरू करीत आहोत.
मी पतसंस्था चळवळीत सातत्याने कार्यरत असून पतसंस्था म्हणजे माझा श्वास आहे. म्हणूनच मलकापूर अर्बन बँकेतील ठेवी परत मिळविण्यासाठी आणि एकूणच पतसंस्थांच्या विकासासाठी देह त्याग करावा लागला तरी बेहतर – काका कोयटे , अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन.
आंदोलन प्रसंगी आज १२ मे २०२३ रोजी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष श्री. काका कोयटे, संघर्ष समितीचे अध्यक्ष व राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी आणि तज्ज्ञ संचालक श्री.सुदर्शन भालेराव तसेच सर्व सहकारी पतसंस्थांचे शेकडो प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनात आंदोलकांच्या वतीने खालील मागण्या करण्यात आल्या.
१) मलकापूर अर्बन बँकेच्या गैरव्यवहाराच्या कामकाजाची कलम ८८ अन्वये तातडीने चौकशी करण्यात यावी, जास्तीत जास्त १ महिन्यात ही चौकशी पूर्ण करण्यात यावी.
२) या चौकशी अहवालाप्रमाणे दोषी संचालकांवर गैरव्यवहाराच्या रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
३) गैरव्यवहाराच्या रकमा वसूल करण्यासाठी संचालकांच्या मालमत्ता जप्त कराव्यात..
४) मलकापूर अर्बन बँकेवर ठेवीदार पतसंस्थांच्या प्रतिनिधींचे प्रशासक मंडळ नेमण्यात यावे.
५) मलकापूर अर्बन बँकेच्या सर्व कर्जदारांची यादी, त्यांचे अकाऊंट स्टेटमेंट व तारणी मालमत्तेचा तपशील मिळावा.
या प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोपटे यांनी सहकारी पतसंस्थांसाठी मी सातत्याने कार्यरत असून पतसंस्था म्हणजे माझा श्वास आहे. म्हणूनच मलकापूर अर्बन बँकेतील ठेवी परत मिविण्यासाठी आणि एकूणच पतसंस्थांच्या विकासासाठी देह त्याग करावा लागला तरी बेहत्तर अशी आक्रमक भूमिका घेतली.
प्रसंगी बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष व राज्य फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक श्री.राधेश्यामजी चांडक आणि मा.सहकारी मंत्री श्री.अतुलजी सावे यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. मलकापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री. चैनसुख संचेती यांचे बरोबर बैठक आयोजित करून मार्ग काढू. असे आश्वासन दिल्याने आजचे उपोषण मागे घेण्यात आले. उद्या होणाऱ्या या बैठकीत मा.सहकार मंत्री श्री.अतुलजी सावे यांनी तोडगा काढला नाही, तर मलकापूर अर्बन बँकेच्या सर्व संचालकाविरोधात MPID कायद्याखाली गावोगावी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी उपस्थित पतसंस्थांचे प्रतिनिधी अतिशय आक्रमक झालेले होते.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मा.आमदार श्री.धीरज लिंगाडे, अध्यक्ष रामभाऊ लिंगाडे, पतसंस्था बुलढाणा, नागपूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष श्री. राजेंद्र घाटे, श्री.रामभाऊ उमाळकर, श्री.मंगेश व्यवहारे, श्री.पंडीतराव देशमुख, श्री.राजाभाऊ देशमुख, श्री. दिपक देशमाने, श्री. बी. डी. पाटील, डॉ. सुकेश झंवर, श्री.संतोष मापारी, श्री.आबासाहेब देशमुख, श्री.श्रीरंग पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.