समताच्या सुरक्षित ठेवीं बरोबर सुरक्षित सोनेतारण कर्ज ही आमची प्रेरणा – श्री.दत्तात्रय गावडे, चेअरमन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताच्या सुरक्षित ठेवीं बरोबर सुरक्षित सोनेतारण कर्ज आमची प्रेरणा – श्री.दत्तात्रय गावडे , चेअरमन
महेश्वर मल्टीस्टेट आणि महेश्वर पतसंस्थेचे चेअरमन श्री.दत्तात्रय गावडे व पदाधिकाऱ्यांचा समता पतसंस्थेच्या वतीने सत्कार करताना.
कोपरगाव : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समता नागरी सहकारी पतसंस्था समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत सर्वसामान्य सभासदांच्या ठेवींना सुरक्षितता देत आहे. संस्थेने कर्ज वाटपामध्ये ही सुरक्षितता मोठ्या प्रमाणात आणली असून संस्थेच्या सुरक्षित सोनेतारण कर्जालाही सुरक्षितता प्राप्त केली असून सभासदांच्या ठेवी आणि कर्जदारांना देण्यात येणारे सुरक्षित सोनेतारण कर्ज हे आमच्यासाठी प्रेरणा आहे.सोनेतारण कर्ज हे संस्थेला सुरक्षितता प्राप्त करून देणारे कर्ज असल्यामुळे आम्हीही आमच्या संस्थेत मोठ्या प्रमाणात सोनेतारण कर्ज वाटपावर भर दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सभासद हिताच्या नव नवीन योजना आणि उपक्रम राबविणारी समता पतसंस्था असून स्वतःला सुरक्षितता निर्माण करणारी पतसंस्था म्हणूनही महाराष्ट्रात ओळखली जाते.असे गौरवोद्गार महेश्वर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी आणि महेश्वर नागरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.दत्तात्रय गावडे यांनी काढले.
पाथर्डी येथील विश्वविनायक मल्टिस्टेटचे चेअरमन श्री.मोदक शहाणे व्हाउचरलेस बँकिंग प्रणाली विषयी माहिती घेताना.
समताची बाह्य आणि अंतर्गत रचना, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त योजना , उपक्रम, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम विशेष कौतुकास्पद असून ग्राहकाला प्रत्येक काउंटर समोर बसण्याची व्यवस्था करणे. ही विशेष उल्लेखनीय व्यवस्था असल्याचे विश्वविनायक मल्टीस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री.मोदक शहाणे यांनी सांगितले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास महाराष्ट्रातील विविध भागातील पतसंस्था सदिच्छा भेट देत असतात. तसेच महाराष्ट्रातील मल्टीस्टेट को – ऑप.क्रेडिट सोसायट्या ही मोठ्या प्रमाणात सदिच्छा भेटी देऊन समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, योजना, उपक्रम, कामकाज यांची सविस्तर माहिती घेऊन त्या राबविण्याचा प्रयत्न करत आहेत.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास २१ जुलै २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील महेश्वर मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी आणि महेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, चेअरमन श्री.दत्तात्रय गावडे,महेश्वर पतसंस्थेचे व्हा.चेअरमन श्री.अनिल भदागरे, सचिव श्री.संगिता इथापे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जमीर शेख, शाखाधिकारी श्री. रोहित उदमले, श्री.धीरज इथापे, सौ. अर्चना घोडके, श्री.संदीप साबळे, सौ.शैलजा पवार, श्री.अरविंद गोंधळी, श्री.नितीन खराटे, श्री.सचिन जगताप, सौ.स्वाती केमकर, श्री.संतोष रायकर, श्री.दत्तात्रय शितोळे, श्री.राजीव जंगले, श्री.भाऊसाहेब काकडे, लेखापाल सौ.प्रीतम ठोमसकर आणि पाथर्डी तालुक्यातील विश्वविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री.मोदक शहाणे, शाखाधिकारी श्री.अनिल शिंदे, श्री.प्रवीण शेळके आदी पदाधिकारी,अधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली.
समता पतसंस्थेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग, या पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक बँकिंग प्रणाली विषयी ठेव विभागाचे श्री.संजय पारखे , मुख्य कार्यालयाचे अधिकारी आणि सुधनच्या कामकाज प्रक्रियेविषयी माहिती श्री.विशाल बोधक, सुधन कार्यालयाचे अधिकारी यांनी सविस्तर दिली.तसेच महेश्वर मल्टीस्टेट आणि पतसंस्थेचे चेअरमन श्री.दत्तात्रय गावडे यांनी संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्यासोबत असणाऱ्या मैत्रीपूर्ण आठवणींना उजाळा दिला.
समता पतसंस्था आणि सुधन विषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल महेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन श्री.अनिल भदागरे यांनी समता पतसंस्था आणि सुधनचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे आभार मानत पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.