नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी समताच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी – श्री.भरत दाते, कोपरगाव शहर पोलीस उपनिरीक्षक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी समताच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी – श्री.भरत दाते, कोपरगाव शहर पोलिस उपनिरीक्षक
कोपरगाव : भारत देशातील व्यवस्था लोकशाही पद्धतीची अतिशय प्रबळ अशी व्यवस्था समजली जाते. जनतेतून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी प्रबळ अशा व्यवस्थेचे नेतृत्व करून देशाचा विकास साध्य करत असतात. समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापन समितीने ही लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन विद्यार्थी प्रतिनिधी निवडलेले आहे. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःमधील नेतृत्व गुण विकसित करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या समितीच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधींनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून समता इंटरनॅशनल स्कूलचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवून द्यावी.असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस उपनिरीक्षक श्री.भरत दाते यांनी केले.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षासाठी लोकशाही पद्धतीने विद्यार्थी परिषदेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शपथ विधी सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य श्री.समीर अत्तार यांनी करून दिला तर सत्कार समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थापक काका कोयटे यांनी भूषविले.
शपथ विधी सोहळ्याचे प्रास्ताविक करताना कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या अंगी लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली होती. लोकशाही पद्धतीने निवडणूक समिती मार्फत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. त्या अर्जांची छाननी करून मुलाखती घेऊन निवड झालेले विद्यार्थी शपथ घेऊन पद ग्रहण करणार आहे. दिलेल्या पदांच्या माध्यमातून समताची शिस्त ते आचरणात आणणार आहे.
समता स्कूलच्या विद्यार्थी परिषदेत प्राथमिक विभागात कलश बागरेचा याची मुलांमध्ये तर मुलींमध्ये इपसिता राय हिची मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली.माध्यमिक विभागात मुलांमध्ये आर्यन कुमार तर मुलींमध्ये नेतल समदाडिया हिची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली.आगम सांड याची मुलांमध्ये आणि श्रेयश्री पाटील हिची मुलींमध्ये उप विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली.अकॅडमी प्रमुख अद्वेता भोसले व वैदेही राहतेकर, सांस्कृतिक प्रमुख देशना अजमेरा व नूतन लाहोटी, शिस्त विभाग प्रमुख शांभवी देशमुख व हेतूल पारीख, स्वच्छता विभाग प्रमुख गोजिरी चर्पे व साईराज लाहोटी, क्रिडा विभाग प्रमुख सुखदा उगले व प्रणव गाजरे, झेनिथ विभाग प्रमुख आर्या सांड व सार्थक लाड, प्लॅटिनम विभाग प्रमुख रेणुका थोरात व कृष्णा घुले, ओयासिस विभाग प्रमुख आयुष गावित व संस्कार उंडे, कॉसमॉस हाऊस विभाग प्रमुख अनुज जेजुरकर व उत्कर्ष तासकर आदिंची निवड झाली.
समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी परिषदेच्या विविध समित्यांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक श्री.भरत दाते यांच्या हस्ते शपथ देऊन पद ग्रहण सोहळा समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मेस विभागाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे, प्राचार्या सौ.हर्षलता शर्मा, पालक वर्ग यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
प्रसंगी विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध संचलन करून तालबद्ध स्वरूपात पद ग्रहण केले.विद्यार्थी परिषदेवर निवड झालेल्या प्रत्येक सदस्याने निष्ठेने शाळेची सेवा करण्याची शपथ घेतली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नक्षत्रा जपे व वृष्टी कोठारी यांनी केले. उपस्थितांचे आभार शिक्षिका चैताली पठारे यांनी मानले.