राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थसिद्धी पतसंस्थेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात बदल करणार – भगवान कोठावळे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थसिद्धी पतसंस्थेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात बदल करणार – भगवान कोठावळे, अध्यक्ष
प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोळपे यांचा सत्कार करताना अर्थसिद्धी पतसंस्थेचे अध्यक्ष भगवान कोठावळे व इतर मान्यवर.
पुणे : जिल्ह्यातील बिबवेवाडी येथील अर्थसिद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा शुभारंभ ४ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. या वेळी अर्थसिद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष भगवान कोठावळे म्हणाले की, आमची संस्था २३ वर्षापासून कार्यरत आहे.अतिशय धिम्या गतीने प्रगती सुरू होती.विश्वेश्वर सहकारी बँकेचे माजी चेअरमन सुनिल रुकारी व चेअरमन अनिल गाढवे यांच्या प्रेरणेने प्रगती करीतच होतो.आता महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाने अधिक वेगाने प्रगती करणार आहोत. तसेच त्यासाठी आम्ही संस्थेच्या अंतरंगात देखील बदल केला आहे. संस्थेचे प्रवेशद्वार बिबवेवाडीच्या मुख्य रस्त्यावर आलेले असल्याने त्याचा फायदा होणार आहे.सुधन गोल्ड लोनच्या माध्यमातून आम्ही सोनेतारण कर्जाचे प्रमाण वाढवायचे ठरविले आहे. राज्य फेडरेशनच्या सहकार उद्यमीच्या माध्यमातून महिला बचत गटाद्वारा २२५ महिलांचे संघटन करून व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना प्रोत्साहन देणार आहोत. त्यांच्या हाताला काम देऊन संस्थेच्या उत्पन्नात अधिक भर पडणार आहे.
२ वर्षापर्यंत येणाऱ्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत अर्थसिद्धी पतसंस्थेचा व्यवसाय २५ कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्प आजच्या दिनी आम्ही करत असल्याचे अर्थसिद्धी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत तोडकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची प्रमुख पाहुणे होते. तर विश्वेश्वर सहकारी बँकेचे माजी चेअरमन सुनिल रुकारी व चेअरमन अनिल गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. अर्थसिध्दी पतसंस्थेचे अध्यक्ष भगवान कोठावळे, उपाध्यक्ष श्रीकांत तोडकर, संचालक गणेश शेडगे, सुनिल खडके, सुनिल कसबेकर जितेंद्र मोटे,सौ.शिल्पा कोंढाळकर, सौ.शुभांगी गायकवाड, सौ.प्रणिता तोडकर, कु.प्रणोती कोठावळे, हितचिंतक, सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.