ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोयटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कारातून केली भावनांच्या रंगांची उधळण…

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

कोयटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कारातून केली भावनांच्या रंगांची उधळण…

कोपरगाव : कोपरगाव शहरातील निवारा परिसरात असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे २०२३ – २४ चे ‘नवरस : रंग भावनांचे’ वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ समता पतसंस्थेचे संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक सचिन शरद गवारे व सौ.निशा सचिन गवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

प्रमुख पाहुणे सचिन गवारे मनोगतात म्हणाले की, कोयटे विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सर्व सामान्यांचे हुशार, होतकरू विद्यार्थी आहेत. विद्यालयातील विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या पदांवर कार्य करून कोयटे विद्यालयाला नावलौकिक मिळवून देतील. तसेच गवारे नगर या भागात ही कोयटे विद्यालयाची शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे म्हणाल्या की, गेल्या २२ वर्षापासून स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाच्या माध्यमातून अल्प उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना विद्यादानाचे सेवा भावी काम कोयटे परिवार करत आहेत. या विद्यालयात शिकणारा विद्यार्थी बौद्धिक व विविध कला गुणांनी परिपूर्ण व्हावा. यासाठी व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक – शिक्षिका नेहमीच प्रयत्नशील असतात. वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करणे हा देखील त्यातीलच एक भाग असून यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कला – गुणांना वाव मिळतो.

विद्यालयातील श्रेया लाड, जानव्ही शर्मा, वेदिका दाभाडे, श्रेया कसबे, रजनी यादव, वेदिका गरड, आराध्या लाड, गौरी कुहिले, तन्वी काळे या विद्यार्थिनींनी नवदुर्गांची वेशभूषा करून अनुक्रमे शृंगार, हास्य, वीर, करुण, रौद्र, शांत, भक्ती, विभत्स भयानक अशा नव रसांची माहिती सांगितली. तसेच कलाविष्कारातून विविध भावनांच्या रंगांची सामूहिक नृत्य स्वरूपात कोयटे विद्यालयाच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी उधळण केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन गवारे व क्रमाचे अध्यक्ष कांतीलाल जोशी यांचा सत्कार विद्यालयाचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते तर सौ.निशा गवारे यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते करून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षिका तृप्ती कासार यांनी केले. अध्ययन व विविध क्रिडा प्रकार, स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभावरी नगरकर यांनी केले. या वेळी स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे, प्राचार्या हर्षलता शर्मा, न्याती समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर आत्तार , शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, सदस्या जोत्सना पटेल, शोभाताई भावसार, रंगनाथ खानापुरे, गोविंद मधुकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षिका तृप्ती कासार, मनिषा कांबळे, स्वप्नाली महिरे, जागृती ठाकूर, छाया ओस्तवाल, नाजमिन अत्तार, सोनाली पवार, त्रिवेणी पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका आशा मोकळ यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे