देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

“राज्यस्तरीय आद्य युवा संसदेत विद्यार्थ्यांनी उंचावला समताचा झेंडा ”

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

राज्यस्तरीय आद्य युवा संसदेत विद्यार्थ्यांनी उंचावला समताचा झेंडा 

कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जडणघडण व नेतृत्वगुणांचा विकास घडवून आणण्यासाठी ‘समता युथ पार्लमेंट – २०२५’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून प्रेरणा घेत, छत्रपती संभाजीनगर येथील स्टेपिंग स्टोन्स हायस्कूलतर्फे घेण्यात आलेल्या ‘आद्य युवा पार्लमेंट’ या राज्यस्तरीय स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, परिपक्व विचार व प्रभावी नेतृत्वगुण यावर आधारित सादरीकरण करत परीक्षकांची मनं जिंकली. विविध गटांमध्ये उल्लेखनीय पारितोषिके पटकावत त्यांनी आपली चमक दाखवली. सुयश शिंदे, साईश जोशी व दक्ष ओस्तवाल यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून विशेष गौरव मिळवला, तर आदिश आचार्य, धैर्य दोडीया व मिथिल काळे यांनी विशेष पारितोषिके पटकावली.

मल्हार जपे व नंदिनी मोटवानी यांना ‘सर्वोत्कृष्ट समीक्षक तथा टिकाकार’ हा मान मिळाला. मनवा औताडे हिच्या नावीन्यपूर्ण कल्पनांनी उपस्थितांची मने जिंकली. इप्सिता राय हिने प्रभावी वक्तृत्वातून ‘उत्कृष्ट वादविवादपटू’ हा किताब पटकावला. सृष्टी वक्ते हिला ‘उत्कृष्ट नेतृत्व’ या सन्मानाने गौरविण्यात आले.

प्रणव गायकवाड (इ. ८वी ते १२वी गट) आणि रुही फुलसुंदर (इ. ४ थी ते ७ वी गट) यांनी ‘सर्वोत्कृष्ट युवा संसद सदस्य’ हा बहुमान पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांना जलिस शाद, जिज्ञासा कुलकर्णी, पूर्वी श्रीवास व सोमनाथ सोनवणे या शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.

या यशानंतर बोलताना कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण समाजात सकारात्मक परिवर्तन घडवतील, असे मत व्यक्त केले. तर प्राचार्य समीर अत्तार म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त व एकाग्रतेच्या जोरावर आपले व्यक्तिमत्त्व घडवले असून त्याचं फलित म्हणजे हे दैदिप्यमान यश आहे.”

या यशामुळे समता इंटरनॅशनल स्कूलचा झेंडा राज्यस्तरावर फडकला आहे. संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, शालेय व्यवस्थापन समिती तसेच कोपरगाव व परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे