इंजिनिअर्स डे निमित्त इंजिनिअर्स व सभासद यांचे हस्ते श्रींची आरती करून केला सत्कार
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
इंजिनिअर्स डे निमित्त इंजिनिअर्स व सभासद यांचे हस्ते श्रींची आरती करून केला सत्कार….
कोपरगाव–१५ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय अभियंता (इंजिनिअर्स) दिन’ म्हणुन साजरा केला जातो. इंजिनिअर पदवी घेऊन प्रत्यक्षात राष्ट्राची सेवा करत असतात. या दिवशी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखांमध्ये संस्थेचे सभासद, ग्राहक असलेले इंजिनिअर्स यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या शाखांत विराजमान असेलेल्या श्रींची इंजिनिअर्स, इतर सभासदांच्या हस्ते आरती करण्यात आली.
राहाता शाखेत ठेवीदार श्री.अविनाश जेजुरकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कोपरगाव शाखेत सभासद सौ.व श्री.सतीश गुजराथी यांनी आरती केली.
राहुरी शाखेत राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.राजेंद्र इंगळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली, जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअर श्री.धनंजय डहाळे यांनी आरती केली.
नांदेड शाखेचे ठेवीदार श्री.धरमचंद सोनी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नाशिक शाखेचे ठेवीदार श्री.मेहता यांच्या हस्ते सकाळी तर सायंकाळी श्री.किरण सोनार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. वैजापूर शाखेत सकाळी श्री.दत्तात्रय थोरात यांनी श्री गणेशांची आरती केली.
येवला शाखेचे ठेवीदार सौ.व श्री.वैराळे यांनी सकाळी तर सायंकाळी सौ.व श्री. भाबड यांनी आरती केली. शिर्डी शाखेतील ठेवीदार सौ.व श्री.जोशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. अहमदनगर शाखेत श्री.मनोहर चव्हाण यांनी आरती केली.
श्रीरामपूर शाखेत सकाळी खातेदार डॉ.सौ.रेखा संतोष झेंडे यांचे हस्ते आरती करण्यात आली. आरती नंतर शाखांमध्ये उपस्थित असलेले सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, शाखाधिकारी, कर्मचारी आदींना प्रसादाचे वाटप करण्यात आले.