सभासदांच्या हिताचे निर्णय घेणारी समता पतसंस्था – श्री कुणाल शिरोडे
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
सभासदांच्या हिताचे निर्णय घेणारी समता पतसंस्था – श्री कुणाल शिरोडे
कोपरगाव – समता नागरी सहकारी पतसंस्था नेहमीच ग्राहक,सभासदांसाठी विविध योजना,उपक्रम राबविणारी पतसंस्था असून गेली ३५ वर्षे सभासदांच्या हिताचे निर्णय घेणारी पतसंस्था म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे त्यामुळे सभासदांचा देखील तितकाच विश्वास समतावर आहे.असे गौरवोद्गार कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध किराणा व्यापारी श्री कुणाल चांगदेव शिरोडे यांनी काढले.
समता पतसंस्थेच्या कोपरगाव शाखेत १६ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा ठेवण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.सत्यनारायण महापूजा आणि सकाळची गणपतीची आरती सौ प्रतिभा व श्री कुणाल चांगदेव शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आली.त्यांचा सत्कार कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री आप्पासाहेब कोल्हे यांनी केला.
तसेच संस्थेच्या इतर शाखात सभासद,ठेवीदार, कर्जदार आदींच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.कोपरगाव शाखेत सायंकाळची आरती सौ व श्री किरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.राहाता शाखेत ठेवीदार श्री. बाबासाहेब वाघे यांनी सकाळी तर सायंकाळी श्री मनीष गणेश जैस्वाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
जामखेड येथील शाखेत खातेदार श्री.राहुल लोकरे यांनी आरती केली. नांदेड शाखेचे ठेवीदार डॉ सत्यनारायण चौधरी यांनी सकाळी तर सायंकाळी ठेवीदार शिवराज मुगावे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
नाशिक शाखेचे ठेवीदार श्री.चंदनदास दुबे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. वैजापूर शाखेत श्री.बाळासाहेब थोरात यांनी गणेशाची आरती केली. येवला शाखेचे ठेवीदार सौ.व श्री.शितोळे यांनी आरती केली. शिर्डी शाखेतील ठेवीदार सौ व श्री जपे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
अहमदनगर शाखेत नगरसेवक व ठेवीदार श्री.प्रकाश भागानगरे यांनी आरती केली. श्रीरामपूर शाखेत सकाळी सभासद श्री किरण रवींद्र काळे यांचे हस्ते आरती करण्यात आली. आरती नंतर शाखांमध्ये उपस्थित असलेले सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, शाखाधिकारी, कर्मचारी आदींना प्रसादाचे वाटप करण्यात आले.