समता परिवाराच्यावतीने सी.ए., डॉक्टर, शेतकरी यांचा सन्मान
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता परिवाराच्यावतीने सी.ए., डॉक्टर,शेतकरी यांचा सन्मान
सी.ए दिनानिमित्त कोपरगाव शहरातील प्रसिद्ध सी.ए. श्री दत्तात्रय खेमनर यांचा सत्कार करताना समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे. समवेत ज्येष्ठ संचालक श्री जितूभाई शहा, श्री संदीप कोयटे, जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड.
कोपरगाव : समता चॅरिटेबल ट्रस्ट,समता नागरी सहकारी पतसंस्था सामाजिक,सहकार, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात सतत अग्रेसर असून समाज हिताच्या कार्यात सहभाग घेत असतात.त्याचाच एक भाग म्हणून आज १ जुलै रोजी तिन्ही क्षेत्रातील महत्वाच्या घटकांचा विशेष दिन येणे हा योगा – योगच मानावा लागेल. या दिवसाचे औचित्य साधून समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोपरगाव, गांधी चौक(कोपरगाव), शिर्डी, राहता, राहुरी, श्रीरामपूर, अहमदनगर, प्रेमदान चौक (अहमदनगर), येवला, नाशिक, वैजापूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे, विश्रांतवाडी या शाखांचे शाखाधिकारी, कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात, सी.ए.,डॉक्टरांच्या कार्यालयात जाऊन समता महिला बचत गटाच्या महिलांनी समता महिला बचत गट उत्पादित अगरबती व कापूर एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन सत्कार करत सन्मान केला गेला.
प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असते.त्या विशेष दिवसाच्या अनुषंगाने त्या दिवसाचा पृथ्वीवरील घटकाशी संबंध येत असतो त्याप्रमाणे आजचा १ जुलै २०२२ हा दिवस जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी,वाणिज्य क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणारा सी.ए.आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर यांचा दिवस म्हणून पूर्ण देशात साजरा केला जातो.