ठेवीदार ग्राहकांबरोबरच दैनंदिन अल्पबचत प्रतिनिधी यांचीही संस्थेच्या प्रगतीत महत्वाची भूमिका – काका कोयटे ; नाशिक शाखेत कृतज्ञता व गौरव सोहळा संपन्न
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
ठेवीदार ग्राहकांबरोबरच दैनंदिन अल्पबचत प्रतिनिधी यांचीही संस्थेच्या प्रगतीत महत्वाची भूमिका – काका कोयटे नाशिक शाखेत कृतज्ञता व गौरव सोहळा संपन्न
कोपरगाव – समता पतसंस्थेच्या नाशिक शाखेच्या आर्थिक प्रगतीत अल्पबचत प्रतिनिधी व अल्पबचत ग्राहक, सभासद, ठेवीदार यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या ठेवींना सुरक्षितता देऊन त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास खूप महत्वाचा वाटतो त्यामुळे या सर्वांचे गुण शब्दात व्यक्त न करता येण्या सारखे आहे पण तरीही या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे.तसेच ठेवीदार ग्राहकांबरोबरच दैनंदिन अल्पबचत प्रतिनिधी यांचीही संस्थेच्या प्रगतीत महत्वाची भूमिका असते.त्यामुळे त्यांचाही गौरव होणे गरजेचे आहे तसेच ‘नाशिक शाखेतील ठेवीदार हे छोटे छोटे व्यापारी असून या व्यापाऱ्यांच्या विश्वासावरच नाशिक शाखेने उच्च शिखर गाठले आहे या यशामध्ये नाशिक शाखेतील अल्पबचत प्रतिनिधींची भूमिका महत्वाची आहे. ज्या उद्देशाने नाशिक शाखेची स्थापना तो उद्देश यशस्वी झाला आहे.नाशिककरांचा समता वरील विश्वास असाच वृद्धिंगत व्हावा’. असे प्रतिपादन समता नागरी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या नाशिक शाखेत ९ऑगस्ट२०२१ रोजी अल्पबचत ग्राहक, सभासद, ठेवीदार यांचा कृतज्ञता सोहळा व अल्पबचत प्रतिनिधींचा गौरव सोहळा नाशिक येथे राजलक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. नाशिक शाखेचे नियमित ठेवीदार म्हणुन श्री गजानन रत्नपारखी यांचा संस्थेचे चेअरमन काका साहेब कोयटे, श्री.फराज अब्दुल हक यांचा श्री. संदीप झारेकर. श्री.राजेंद्र ढोले यांचा श्री.जनरल मॅनेजर सचिन भट्टड, श्री कोंडाजी मुरलीधर बोराडे यांचा श्री. चंद्रशेखर दंदणे, श्री. प्रकाश सावंत कर्जदार तर ठेवीदार श्री.जगवाणी मनिष, श्री.शिवनाथ संगमनरे यांचा श्री.बी.बी. दंदणे,श्री.अमोल घुमरे,श्री.शुभम ठाकरे यांचा श्री.किरण झारेकर, श्री.विकी वाच्छानी यांचा मुख्य कार्यालयातील श्री.संजय पारखे, श्री.गोरख पाटील यांचा श्री.शामराव झारेकर सत्कार करण्यात आला.
अल्पबचत प्रतिनिधी श्री.निलेश हिंगमिरे यांचा राहूल दिवटे, श्री. विनोद नामदे यांचा अॅड अरुण आवटे श्री.विजय महमाने यांचा श्री रविंद्र दंदणे, श्री. संकल्प नगरकर यांचा श्रीमती सुशिलाताई आंधोळकर,श्री.महेश गोसावी यांचा श्री.अनिल महमाने,श्री.संजय आंबेकर यांचा श्री.व्ही.बी. बिडवाई,श्री.बद्रीनाथ झारेकर यांचा श्री.सिद्धेश्वर दंदणे,श्री. संतोष पुरोहित यांचा प्रमोद बेनके, श्री.कैलास राजमाने यांचा श्री.शिवकल्याण हिंगमिरे यांनी सत्कार करून गौरव केला. तसेच कृतज्ञता सत्कार व गौरव सोहळ्यानंतर लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड, शुअर सेल शुअर पेमेंट योजना, क्यु आर कोड याबाबत नेटविन कंपनीचे मार्केटिंग अधिकारी श्री. मसूद अत्तार व तेजस जोशी चित्रफितीच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड व ऑडीट विभागाचे श्री. संजय पारखे यांचा सत्कार नाशिक शाखेचे श्री.शांतीकुमार पांडे यांनी केला.
प्रसंगी संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांचे सहकार क्षेत्रातील योगदान आणि अनुभवाचा सहकार विभागाला फायदा होण्यासाठी राज्य सहकार समितीच्या सदस्य पदी निवड झाल्या बद्दल नाशिक जिल्हा लिंगायत संघर्ष समिती, नाशिकरोड तरुण वीरशैव समाज आणि नाशिक शाखेच्या अल्पबचत प्रतिनिधी व ठेवीदारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्याला लिंगायत संघर्ष समिती नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री.संदीप झारेकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.चंद्रशेखर दंदणे तरुण वीरशैव समाजचे अध्यक्ष बाळकृष्ण दंदणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक श्री.अनिल चौगुले आदिंसह नाशिक शाखेचे ठेवीदार, कर्जदार, अल्पबचत प्रतिनिधी, हितचिंतक उपस्थित होते. गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन नाशिक शाखेचे शाखाधिकारी श्री.आनंद निकुंभ यांनी केले. सोहळा यशस्वितेसाठी नाशिक शाखेतील शाखाधिकारी, कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शाखेचे कर्मचारी श्री. शांतीकुमार पांडे यांनी मांडले.