समता परिवारामुळे माझा आजपर्यंतचा प्रवास सुखकर – श्री.गुलशन होडे, संचालक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता परिवारामुळे माझा आजपर्यंतचा प्रवास सुखकर – श्री. गुलशन होडे, संचालक
कोपरगाव : समता पतसंस्थेच्या स्थापनेपासून जनमंगल प्रतिनिधी म्हणून १० वर्ष काम करत असताना समता परिवार माझ्या सुख दुःखात सहभागी होता. त्यानंतरही काका आणि जितूभाई यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे मी कोपरगाव तालुक्यात होलसेल व्यापारी म्हणून नावारूपाला आलो. माझा व्यापारातील अनुभव, प्रामाणिकपणा यामुळे मला पुन्हा काकांनी समता पतसंस्थेच्या संचालक मंडळात संचालक म्हणून संधी दिली. त्यांनी दिलेल्या संधीचा प्रामाणिकपणे सोने करण्याचा प्रयत्न करत आहे. समताच्या प्रगतीत माझा आणि माझ्या परिवाराचा खारीचा वाटा नेहमीच असेल. समता परिवाराने मला अनेक वेळा दिलेल्या संधीमुळे मला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे माझा प्रवास सुखकर बनला आहे.असे मत समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री.गुलशन होडे यांनी व्यक्त केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संस्थेचे संचालक गुलशन होडे यांचा ५२ वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्येष्ठ संचालक श्री जितुभाई शहा यांनी त्यांचा सत्कार करत पेढा भरविला तर मुख्य कार्यालयातील अधिकारी, कोपरगाव शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य कार्यालयातील ठेव प्रमुख संजय पारखे यांनी केले. संस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे, व्यापारी श्री.किरण शिरोडे, जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड, हितचिंतक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार एच.आर उज्वला बोरावके यांनी मानले.