देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

समताने ग्राहक, सभासदांची विश्वासार्हता जपली – संदीप रुद्राक्षे, सहाय्यक निबंधक

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताने ग्राहक, सभासदांची विश्वासार्हता जपली – संदीप रुद्राक्षे, सहाय्यक निबंधक

कोपरगाव : ग्रामीण भागातील समता पतसंस्थेने १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणे ही गौरवास्पद बाब असून सभासद, ग्राहकांची विश्वासार्हता जपली आहे. ही कामगिरी म्हणजे सभासद आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाची पावती आहे. तसेच समताने केवळ ठेवींचा उच्चांक गाठला नाही तर सर्वात सुरक्षित व विश्वसनीय अशा सोनेतारण कर्जामध्ये देखील उल्लेखनीय यश मिळविलेले आहे. समता पतसंस्थेच्या ग्राहकांच्या ठेवींना अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरामुळे सुरक्षितता प्राप्त करून देत आहे.असे प्रतिपादन कोपरगाव तालुका सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्षे यांनी केले.

१० जून २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेस भेट दिली असता, संस्थेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, शाम क्षीरसागर, सहकारी संस्था कोपरगाव सहकार अधिकारी श्रेणी १ चे संदीप नेरे, कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे आदींसह संस्थेचे मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी संस्थेत पेपरलेस बँकिंग मोबाईल बँकिंग, ऑडिट कंट्रोल रूम, सोनेतारण कर्ज प्रक्रिया, समता रिकव्हरी पॅटर्न व समता महिला बचत गट अंतर्गत सुरू असलेल्या सहकार उद्योग मंदिराविषयी सविस्तर माहिती दिली. तर संस्थेचे संजय पारखे यांनी सेल्फ बँकिंग प्रणाली, व्हाउचरलेस बँकिंग प्रणाली विषयी माहिती सांगितली. मुख्य कार्यालयाच्या एच.आर. उज्वला बोरावके यांनी मुख्य कार्यालयात चालणाऱ्या कामकाजाविषयी माहिती दिली.

कोपरगाव तालुक्यात नव्याने रुजू झालेले कोपरगाव तालुक्याचे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्षे यांचा समता पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन काका कोयटे त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सहकारी संस्था कोपरगाव सहकार अधिकारी श्रेणी १ चे संदीप नेरे यांच्या अभिष्टचिंतन दिवसानिमित्त श्याम क्षीरसागर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे