ब्रेकिंग

आधुनिकतेची कास धरून भाग्यलक्ष्मी पतसंस्थेची प्रगतीकडे वाटचाल – काका कोयटे

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

आधुनिकतेची कास धरून भाग्यलक्ष्मी पतसंस्थेची प्रगतीकडे वाटचाल – काका कोयटे

मनमाड : सहकार क्षेत्रात एखाद्या संस्थेची खरी ओळख ही केवळ आर्थिक उलाढालीवरून होत नसून सभासदांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकाभिमुख सेवा यावरून ठरत असते. सन १९८६ पासून भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने जपलेली ४० वर्षांची विश्वासार्ह परंपरा कौतुकास्पद आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सभासदांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी संस्थेने केलेले कार्यालय नूतनीकरण हे प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील अग्रगण्य समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.

मनमाड येथील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या कार्यालय नूतनीकरण समारंभ ६ नोव्हेंबर २०२६ रोजी बाफना टॉवर्स, आझाद रोड येथे राज्य फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप बोगावत, मानद चेअरमन डॉ. सुनील बागरेचा, कार्यकारी संचालक किसनलाल बंब, संचालक सुरेश बारसे, राजेंद्र पगारे, योगेश पाटील, सईदाबी शाह, अशोक सानप, पियुष सुराणा, गिरीश गोगड, लिलाबाई छाजेड, सचिव प्यारेलाल परदेशी तसेच संस्थेचे अधिकारी, कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते.

पतसंस्थांनी काळानुरूप बदल स्वीकारताना आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान, पारदर्शक कारभार आणि सभासदांना सुलभ आर्थिक सेवा यांना प्राधान्य दिले पाहिजे. ठेवींना सुरक्षितता, कर्जदारांना तत्पर सेवा आणि ग्राहकांना आकर्षक सुविधा उपलब्ध करून देणे ही सहकारी संस्थांची महत्त्वाची जबाबदारी आहे. भाग्यलक्ष्मी पतसंस्थेने चार दशकांच्या वाटचालीत निर्माण केलेला विश्वास यापुढेही अधिक दृढ करावा, अशी अपेक्षा काका कोयटे यांनी व्यक्त केली.

संस्थेच्या वतीने अल्पदरात कर्ज, ठेवींवर आकर्षक व्याजदर, सोनेतारण कर्ज तसेच लॉकर सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून संस्थेच्या नव्या कार्यालयीन वाटचालीचा शुभारंभ करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे