समता पतसंस्थेला जालना, कोल्हापूरच्या पतसंस्थांच्या महिला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्थेला जालना, कोल्हापूरच्या पतसंस्थांच्या महिला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
जालना येथील पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी
कोपरगाव : जालना येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील श्री दत्तराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी समता पतसंस्थेच्या विविध योजना, उपक्रम तसेच आधुनिक बँकिंग प्रणाली आणि कार्यपद्धती याबाबत भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या समवेत जालना येथील पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी
समता पतसंस्थेने सहकार क्षेत्रात विकसित केलेल्या मोबाईल बँकिंग, पेपरलेस बँकिंग, नेट बँकिंग, कोअर बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, ई-डॉक्युमेंट, लॉकर सुविधा, ऑनलाइन समता रिकव्हरी पॅटर्न, ऑनलाइन व्हाऊचरलेस बँकिंग आणि सेल्फ बँकिंग यांसारख्या विविध प्रणालींची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच संस्थेच्या फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूमच्या माध्यमातून होणारे नियंत्रण आणि संस्थेची समता लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन योजना याबाबतही माहिती देण्यात आली.
समता महिला बचत गटाचे अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांच्या समवेत कोल्हापूर येथील पतसंस्थेच्या महिला पदाधिकारी व अधिकारी
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, जालना येथून सहाय्यक वसुली अधिकारी पूनम सुनील रावेरकर, व्यवस्थापक सपना यानिकेत जनसारी, रोखपाल शैला अंकुश काळे, शरयू जयप्रकाश सराफ, शीतल अशोकराव जरींग, रेणुका भीमराव देशमुख, वरिष्ठ सहाय्यक नेहा बालकिशन कोत्ताकोंडा, लिपिक योगिता राजू ढोबळे व रोखपाल दीपाली प्रकाश पवार सहभागी झाले. तसेच जालना येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वरिष्ठ सहाय्यक अधिकारी लता मोरे व श्रावणी कस्तुरे उपस्थित होत्या.

श्री दत्तराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, नृसिंहवाडी येथून सीईओ शशिकांत श्रीकांत कोडणीकर, आयटी मॅनेजर शहानुर सलीम शेख, वसुली अधिकारी मृणालिनी प्रमोद गुळवणी, सिनियर ऑफिसर अर्चना अविनाश पुजारी, कॅशियर श्रद्धा शशिकांत कोडणीकर व क्लर्क मीनाक्षी तुषार खोत यांनी भेट दिली.

यावेळी मुख्य कार्यालयातील उज्वला बोरावके तसेच कोपरगाव शाखेतील मयुरी दळवी व सुजाता कदम यांच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी ओमप्रकाश कोयटे उपस्थित होत्या.


