देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

समताच्या सभासदांचा संस्थेवरील विश्वास अढळ

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताच्या सभासदांचा संस्थेवरील विश्वास अढळ

शिर्डी, राहाता व वैजापूर शाखांमध्ये स्नेहमेळावा; ज्येष्ठ नागरिकांना आनंदी जीवनाचा संदेश

शिर्डी : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या विविध शाखांतील सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाचा प्रत्यय शिर्डी, राहाता व वैजापूर शाखांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी व उत्साही जीवन कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन तसेच सभासदांचा स्नेहमेळावा अशा दुहेरी उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

उपस्थित सर्व सभासदांनी संस्थेवरील विश्वास हात उंचावून कायम दर्शविला

यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते अशोक देशमुख यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी जीवन कसे जगावे’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या मिश्कील शैलीतील संवादातून सभासदांनी तब्बल एक तास हसत-खेळत, नाच-गाण्याचा आनंद घेत व्याख्यानाचा अनुभव घेतला. वाढते वय ही मर्यादा नसून आनंदी, सकारात्मक आणि उत्साही जीवन जगण्याची नवी संधी आहे, असा संदेश त्यांच्या मार्गदर्शनातून देण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी समता पतसंस्थेची आर्थिक स्थिती, संस्थेची वाटचाल आणि सभासदांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद असून, हा विश्वास कायम ठेवण्यासाठी संस्था सातत्याने पारदर्शक आणि सभासदाभिमुख काम करीत राहील, असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे ज्येष्ठ सभासद आनंदी जीवन जगताना व्याख्यानाच्या अनुषंगाने विविध गीतांवर ठेका धरताना

मेळाव्यात अनेक सभासदांनी मनोगत व्यक्त करून समता पतसंस्थेवर तसेच काका कोयटे यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करताना भविष्यातही समतासोबतचा हा विश्वासाचा प्रवास असाच कायम राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सभासदांशी थेट संवाद, आनंदाचे क्षण आणि संस्थेच्या वाटचालीबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण करणारा हा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यालयाचे अधिकारी व वैजापूर शाखाधिकारी संजय मोरे, शिर्डी शाखाधिकारी सतीश जेजुरकर, राहाता शाखाधिकारी सचिन आल्हाट व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे