ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

समता नागरी पतसंस्थेची बदनामी केल्याप्रकरणी प्रशांत सोनवणे यांच्याविरुद्ध ५०० कोटींचा दावा; न्यायालयाचा समन्स नोटीस बजावण्याचा आदेश

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता नागरी पतसंस्थेची बदनामी केल्याप्रकरणी प्रशांत सोनवणे यांच्याविरुद्ध ५०० कोटींचा दावा

न्यायालयाचा समन्स नोटीस बजावण्याचा आदेश

कोपरगाव : कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेबाबत युट्युबवर चुकीचे वृत्त प्रसिद्ध करून संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी पाथर्डी येथील प्रशांत बाळासाहेब सोनवणे यांच्याविरुद्ध पतसंस्थेने ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अहिल्यानगर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने सोनवणे यांना समन्स नोटीस बजावण्याचा आदेश पारित केला आहे.

या प्रकरणी समता पतसंस्थेने ॲड.विजय गवांदे यांच्या मार्फत प्रशांत सोनवणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. युट्युब व फेसबुकवरील संबंधित वृत्त डिलीट करावे, संस्थेची लेखी माफी मागावी, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्रांमध्ये जाहीररीत्या माफी प्रसिद्ध करावी, अशी मागणी नोटिशीद्वारे करण्यात आली होती.

मात्र, नोटिशीनुसार माफी न मागितल्याने आणि संबंधित वृत्त सोशल मीडियावरून हटवले नसल्याने पतसंस्थेने न्यायालयात ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. संस्थेची प्रतिमा मलिन करणारे वृत्त प्रसिद्ध केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

या दाव्याच्या अनुषंगाने अहिल्यानगर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाने प्रशांत बाळासाहेब सोनवणे यांना समन्स नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे