समता पतसंस्थेची आधुनिक कार्यपद्धती सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक – सुरसिंग पाटील
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्थेची आधुनिक कार्यपद्धती सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक – सुरसिंग पाटील
कोपरगाव : सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक कार्यपद्धती आणि सभासदांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने वसई तालुक्यातील नालासोपारा येथील मंगलमूर्ती पतसंस्थेच्या संचालक मंडळाने समता नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. समता पतसंस्थेच्या विविध उपक्रमांची आणि आधुनिक बँकिंग सुविधांची माहिती घेताना संस्थेच्या कार्यपद्धतीचा जवळून परिचय झाल्याचे मंगलमूर्ती पतसंस्थेचे अध्यक्ष सुरसिंग रामसिंग पाटील यांनी सांगितले.

सुरसिंग रामसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने या अभ्यास दौऱ्यात समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे आणि असिस्टंट जनरल मॅनेजर योगेश आसने, अक्षय कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या विविध योजना, आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर, सभासदांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि संस्थेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम यांची माहिती यावेळी देण्यात आली. सहकार क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सभासदांना सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

या अभ्यास दौऱ्यात मंगलमूर्ती पतसंस्थेचे अध्यक्ष सुरसिंग रामसिंग पाटील, उपाध्यक्ष वैशाली वसंत शिंदे, संचालिका कल्पना सुरसिंग पाटील, संचालक लक्ष्मणगीर जगन्नाथ बावा, वसंत सखाराम शिंदे, मार्गदर्शक संचालक रत्नदीप लहू मुणगेकर, कार्यकारी संचालक दीपली पाटील, रोखपाल कु. हेमांगी नरेश पाटील, तज्ज्ञ संचालक प्रसाद सुरसिंग पाटील आणि लेखनिक साईशा सुरज मांजरेकर उपस्थित होते.


