ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘जलद चालणे स्पर्धा’ व आनंदी जीवनावर व्याख्यान
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘जलद चालणे स्पर्धा’ व आनंदी जीवनावर व्याख्यान
कोपरगाव : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समता पतसंस्था, ज्येष्ठ नागरिक सेवा मंच आणि श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ (निवारा) यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर रोजी ‘जलद चालणे स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता समता पतसंस्था मुख्य कार्यालय ते कलश मंगल कार्यालय या मार्गावर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी ६० ते ७० वर्षे आणि ७० वर्षांपुढील असे दोन वयोगट करण्यात आले असून, प्रत्येक वयोगटात महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी नाव नोंदणी विजय बंब (७५८८११०३७५) आणि पोपट साळवे (८६०५७७७५५४) यांच्या कडे दिलेल्या मोबाईल नंबर वर करावी.

स्पर्धेनंतर सकाळी १०.३० वाजता कलश मंगल कार्यालय येथे जलद चालणे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते अशोकजी देशमुख यांचे ‘ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी जीवन कसे जगावे – हसत खेळत तणावमुक्ती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, आनंदी जीवन, तणावमुक्ती तसेच सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ‘जलद चालणे स्पर्धा’ आणि अशोकजी देशमुख यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ. सुधाभाभी ठोळे, उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, सचिव उत्तमभाई शहा, कार्याध्यक्ष विजय बंब, समता पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अरविंदभाई पटेल तसेच श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पाताई सुतार यांनी आवाहन केले आहे.


