सभासदांच्या विश्वासाला समताच्या दिनदर्शिकेची जोड; विविध शाखांमध्ये उत्साहात प्रकाशन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सभासदांच्या विश्वासाला समताच्या दिनदर्शिकेची जोड; विविध शाखांमध्ये उत्साहात प्रकाशन
कोपरगाव : सभासदांशी जिव्हाळ्याचे नाते, विश्वासार्ह सेवा आणि शिस्तबद्ध कामकाजाच्या बळावर सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा शाखांमध्ये सन २०२७ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सभासदांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

समता पतसंस्थेची दिनदर्शिका म्हणजे केवळ दिनांक, सण आणि उत्सवांची माहिती देणारे माध्यम नसून संस्था आणि सभासदांमधील जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक आहे. वर्षभर प्रत्येकाच्या घरात स्थान मिळवणाऱ्या या दिनदर्शिकेच्या माध्यमातून संस्थेचा विश्वास आणि आपुलकी अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कोपरगाव येथे सभासद साहेबराव कडनोर, सुभाष वैद्य, डॉ. सुभाष मुंदडा, सी. आर. बजाज, रावसाहेब करडे, वंदना झरेकर आणि वैशाली देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कर्मचाऱ्यांचा सभासदांशी संवाद साधण्यातील नम्रपणा, कामातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि तत्पर सेवा ही समता पतसंस्थेची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. समता ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सभासद आणि सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जोडणारे कुटुंब असल्याचेही त्यांनी नमूद केले
श्रीरामपूर शाखा.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांच्या भक्कम नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली समता पतसंस्थेने राज्यातील अग्रगण्य पतसंस्थांमध्ये स्थान निर्माण केले असल्याचे सभासदांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, पारदर्शक कारभार, ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षितता आणि सभासदाभिमुख सेवा या संस्थेच्या वैशिष्ट्यांचा गौरव करून उपस्थितांनी संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर शाखेत झालेल्या कार्यक्रमात काशिनाथ काळे, सौ. निर्मला काळे, श्री व सौ. अप्पासाहेब पटारे, श्री व सौ. नारायण गायकवाड, डॉ. राज तांबोळी, संजय खेले, जयंतराव गिरमे, तानाजीराव कसार, चांगदेव शिंदे, शिवाजी बारगळ, प्रकाश डोखे, वासुदेव भांबारे, अनिल धनके तसेच सार्वमतचे प्रतिनिधी विशाल वर्धावे उपस्थित होते. यावेळी सभासदांनी संस्थेच्या विश्वासार्ह कार्यपद्धतीचे आणि सभासदाभिमुख सेवेचे कौतुक केले. शाखाधिकारी सौ. पद्मिनी पारखे व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
नेवासा शाखा
नेवासा शाखेत झालेल्या कार्यक्रमात सभासद प्रकाश सोनटक्के (सरपंच, नेवासा बुद्रुक), विठ्ठल दारुंटे, बालेंदर पोतदार, सतीश मुळे, अरविंद घोडके (जिल्हा परिषद शिक्षक) आणि पठाण रहतउल्लाखान आदी उपस्थित होते. यावेळी सभासदांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे आणि सेवाभावी दृष्टिकोनाचे कौतुक केले. शाखाधिकारी अमोल दिवटे व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले.

कोपरगाव येथील कार्यक्रमास बाळासाहेब चिखले, अरुण धुमाळ, संजय धनके, सोपान जपे, साईनाथ गोर्डे, ठकनराव गुंजाळ, कैलास कुलकर्णी, डॉ. गोविंद भोसले, प्रतापराव चव्हाण, विजय फूलफगर, शरद घाटे, राजेंद्र नाईक, नानासाहेब देवकर, माधव पोटे, अनिल जाधव, किसन सांगळे, हासीम पटेल आदी सभासदांसह संस्थेचे संचालक जितूभाई शहा, जनरल मॅनेजर सचिन भट्टड तसेच मुख्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोपरगाव शाखेतील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मानले.


