देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

लिंगायत संघर्ष समिती व व्हायाच्या संयुक्त विद्यमाने “दिपस्तंभ गौरव पुरस्कार” सोहळा उत्साहात संपन्न ; शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष महत्त्व

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

लिंगायत संघर्ष समिती व व्हायाच्या संयुक्त विद्यमाने “दिपस्तंभ गौरव पुरस्कार” सोहळा उत्साहात संपन्न

शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष महत्त्व

पुणे, ३१ मे २०२५ : लिंगायत संघर्ष समिती आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (VIA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वीरशैव लिंगायत दिपस्तंभ स्मृती गौरव पुरस्कार व स्मरणिका प्रकाशन सोहळा” मोठ्या उत्साहात पुण्यातील महर्षी नगर येथील शिवशंकर सभागृहात पार पडला.

सिद्धाराम सालीमठ साखर आयुक्त, पुणे

या सोहळ्याला वीरशैव लिंगायत समाजातील राजकीय तसेच शासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शान वाढवली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील साखर उद्योगावर प्रभाव असलेल्या साखर आयुक्त या शासकीय पदावर शासकीय कार्यरत सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासारखे इतर शासकीय अधिकारी वीरशैव लिंगायत समाजाचे नेतृत्व करत आहे. लिंगायत समाजातील शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे समाजासाठी अभिमानास्पद क्षण निर्माण असून सर्वांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. त्यांनी आपल्या भाषणात लिंगायत समाजातील तरुणांनी शासकीय सेवेत यावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच अशा प्रयत्नांमध्ये लिंगायत संघर्ष समिती व व्हाया यांचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे

लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष सुनील रुकारी आणि व्हाया चे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे राज्यातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांना एकत्र आणण्याचे काम करीत आहे यांच्या मागे सर्व समाज बांधवांनी उभे राहून समाजाची एकजूट दाखवून द्यावी. तसेच समाजातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना एकत्र आणून समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यांसारखे विविध प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमच्यासारख्या शासकीय अधिकाऱ्यांकडे द्यावी असे मत उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांनी मनोगतातून व्यक्त केले.

सरिता सुनील नरके, अप्पर जिल्हाधिकारी, पुणे

लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष सुनील रुकारी आणि व्हाया चे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पुणे येथील साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता नरके, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप भाजीभाकरे आणि राजकीय क्षेत्रातील डॉ.अजित गोपछडे, माजी मंत्री दिलीप सोपल, बसवराज पाटील आदींसह अनेक मान्यवर शासकीय अधिकारी व राजकीय नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्री. श्री. श्री. ज्ञानसिंहसारथीश्वर १०८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गोविंद महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन करण्यात आले.

सुहास मापारी, अप्पर जिल्हाधिकारी, पुणे

हा सोहळा लिंगायत समाजातील एकतेचा, प्रेरणेचा आणि समाजाभिमुखतेचा एक अनोखा अनुभव ठरला. समाजातील युवापिढीला शासकीय सेवेत पुढे येण्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम यशस्वीतेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र या सोहळ्यात पाहायला मिळाले.

संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, पुणे

कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्मृती गौरव सोहळा संयोजन समिती अध्यक्ष सागर रुकारी, लिंगायत संघर्ष समिती राज्य संघटक गुरुनाथ बडूरे, महासचिव भगवान कोठावळे, कोषाध्यक्ष राजेंद्र मुंडे, संघटक पश्चिम महाराष्ट्र स्वप्निल खडके, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन युवक आघाडी अध्यक्ष प्रदीप साखरे आदींसह व्हाया व लिंगायत संघर्ष समिती चे पदाधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे