देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

वीरशैव लिंगायत समाजाच्या एकजुटीसाठी डॉ.अजित गोपछडे यांचा पुढाकार : पुण्यात दिपस्तंभ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

वीरशैव लिंगायत समाजाच्या एकजुटीसाठी डॉ.अजित गोपछडे यांचा पुढाकार : पुण्यात दिपस्तंभ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या एकजुटीसाठी माझी निवड केली आहे. राज्यातील लिंगायत समाजाच्या विविध संघटनांना एका छताखाली आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले. पुण्यात आयोजित वीरशैव लिंगायत दिपस्तंभ स्मृती गौरव पुरस्कार व स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

हा भव्य सोहळा ३१ मे २०२५ रोजी महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (VIA) आणि लिंगायत संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. VIA चे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष सुनील रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

खासदार गोपछडे म्हणाले, “वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना आरक्षण मिळावे, महात्मा बसवेश्वर महामंडळाला अधिक आर्थिक मदत मिळावी, आणि समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” त्यांनी या कार्यासाठी समाजातील सर्व संघटना आणि नेत्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात काका कोयटे यांनीही एकजुटीवर भर देत म्हटले, “समाजातील विविध संघटना सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पातळीवर कार्यरत असून मन व मत भेद विसरून एकत्र आल्यासच समाजाच्या समस्या सुटतील.”

या कार्यक्रमात श्री.श्री.श्री. ज्ञानसिंहसारधिश्वर १०८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गोविंद महाराज औसेकर यांच्या हस्ते गौरव पुरस्कार व स्मरणिका प्रकाशन करण्यात आले.

या वेळी राज्याचे माजी मंत्री दिलीप सोपल, बसवराज पाटील, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता नरके, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप भाजीभाकरे तसेच लिंगायत समाजातील अनेक प्रतिष्ठित शासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्मृती गौरव सोहळा संयोजन समिती अध्यक्ष सागर रुकारी, लिंगायत संघर्ष समिती राज्य संघटक गुरुनाथ बडूरे, महासचिव भगवान कोठावळे, कोषाध्यक्ष राजेंद्र मुंडे, संघटक पश्चिम महाराष्ट्र स्वप्निल खडके, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन युवक आघाडी अध्यक्ष प्रदीप साखरे आदींसह व्हाया व लिंगायत संघर्ष समिती चे पदाधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे