समता पतसंस्थेला सहकार क्षेत्रातील दिग्गजांची सदिच्छा भेट; नवकल्पनांची माहिती व सन्मान सोहळा
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्थेला सहकार क्षेत्रातील दिग्गजांची सदिच्छा भेट; नवकल्पनांची माहिती व सन्मान सोहळा
कोपरगाव (अहिल्यानगर) : समता नागरी सहकारी पतसंस्थेला नुकतीच निवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, बँकिंग तज्ञ गणेश निमकर, मुंबई येथील शिवकृपा पतपेढीचे चेअरमन गोरख चव्हाण आणि अहिल्यानगर जिल्हा स्थैर्य निधी संघाचे नवनियुक्त अध्यक्ष शिवाजी आप्पा कपाळे, संचालक आशुतोष पटवर्धन यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे आणि संचालक संदीप कोयटे यांनी स्वागत करून सत्कार केला.
यावेळी निवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे व अहिल्यानगर जिल्हा स्थैर्य निधी संघ नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी आप्पा कपाळे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. तर बँकिंग तज्ञ गणेश निमकर आणि शिवकृपा पतपेढीचे चेअरमन गोरख चव्हाण यांचा सन्मान संचालक संदीप कोयटे यांनी केला.
या वेळी संस्थेतील अत्याधुनिक सुविधांची माहिती देण्यात आली. विशेषतः मोबाईल बँकिंग, पेपरलेस व व्हाउचरलेस बँकिंग, ऑडिट कंट्रोल रूम, सोनेतारण कर्ज, रिकव्हरी पॅटर्न इ. बाबत सविस्तर माहिती संचालक संदीप कोयटे यांनी दिली. ई.डी.पी. प्रमुख योगेश आसने यांनी डिजिटल बँकिंग प्रणाली समजावून सांगितली, तर व्यवस्थापक विजय गोयल यांनी महिला बचत गटांतर्गत सुरू असलेल्या सहकार उद्योग मंदिराविषयी माहिती दिली.
समता पतसंस्थेच्या नवनवीन योजना व उपक्रम संस्थेच्या प्रगतीचे प्रतीक ठरत असून, सहकार क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणारे ठरत आहे. किराणा दुकानदार छोटे – मोठे व्यापारी यांच्या माध्यमातून संस्थेच्या ग्राहक, सभासदांसाठी नव्याने सुरू केलेला सहकार बास्केट हा उपक्रम देखील वाखणण्याजोगा असल्याचे सूतोवाच निवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी केले.