स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाच्या पालक – शिक्षक सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाच्या पालक – शिक्षक सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव : स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे विद्यार्थी हे देशात विद्यालयाचे नाव चमकवत असून समताची गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा अविरतपणे चालू आहे.सरकारच्या बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यालयाने सेमी इंग्लिशचा अभ्यासक्रम ही चालू केला आहे. विद्यालयातील सर्वच मुलं ही तुमची मुलं ती आमची मुलं आम्ही समजतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने आयुष्यात यशस्वी होऊन जगात त्याने स्वतःचे नाव उंचवावे.त्यांच्या या प्रकारच्या प्रगतीसाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.असे प्रतिपादन स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांनी केले.
कोपरगाव शहरातील निवारा परिसरातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाची पालक – शिक्षक सभा अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेला पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना निवारा हौसिंग सोसायटीचे माजी चेअरमन श्री.सुरेंद्र व्यास म्हणाले की, निवारा परिसरातील कोयटे विद्यालयातील विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सुप्त गुणांचा विकास, आत्मिक कौशल्य आत्मसात करत आहेत.पालकांनी देखील पाल्य घरी आल्यानंतर त्याच्या कला गुणांना अधिक वाव देण्यासाठी त्याच्यावर सकारात्मक संस्कार करणे गरजेचे आहे. तरच पालक आणि शिक्षक मिळून एक परिपूर्ण असा विद्यार्थी घडू शकेल.
सभेची सुरुवात स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, प्रमुख पाहुणे लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष श्री.सुमित भट्टड, सभेचे अध्यक्ष श्री.सुरेंद्र व्यास, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, सदस्य श्री.रंगनाथ खानापुरे, श्री.मधुकर मोरे, श्री.बाबासाहेब सालके, सौ.मीनाताई व्यास, सौ.सुनंदाताई भट्टड आणि पालक यांच्या शुभ हस्ते विद्येची आराध्य देवता असलेल्या सरस्वतीचे प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. सभेचे अध्यक्ष स्थान श्री.सुरेंद्र व्यास यांनी स्वीकारले.त्यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.रंगनाथ खानापुरे यांच्या हस्ते तर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष श्री.सुमित भट्टड यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.आशा मोकळ यांनी केले.लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष श्री.सुमित भट्टड यांच्या हस्ते विद्यालयाच्या बालवाडी ते इ.५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. तसेच श्री.रंगनाथ खानापुरे, श्री. मधुकर मोरे, श्री.बाबासाहेब सालके यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पूर्ण वेळ देणार असल्याचे सांगितले.
प्रसंगी पालक म्हणून उपस्थित असलेल्या माता सौ.कविता चौधरी, सौ.श्वेता पुरे, सौ.गायत्री पाटील, सौ.मुमताज शेख, सौ.सीमा पठाण आदींनी भावनिक होत मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, लहान मुलांवर शिक्षण, शिस्त आणि संस्कार कोयटे विद्यालयच करू शकते.त्यामुळे व्यवस्थापन आणि शिक्षकांचे आभार मानत एका चिखलाच्या गोळ्याला अतिशय उत्कृष्टपणे आकार दिल्याबद्दल सर्वांचेच कौतुक केले आणि या पुढे ही अतिशय उत्कृष्टपणे आकार दिलेल्या गोळ्याचे चांगल्या संस्कारशील व्यक्तिमत्त्वात रूपांतर करावे.अशी भावनिक इच्छा व्यक्त केली.
या सभेचे सुत्रसंचालन शिक्षिका सौ.मनिषा कांबळे यांनी केले.सभा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.आशा मोकळ, शिक्षिका सौ. स्वप्नाली महिरे,सौ.जागृती ठाकूर, सौ.छाया ओस्तवाल, सौ.नाजमिन अत्तार, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार श्रीमती तृप्ती कासार यांनी मानले.