महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची निशांत मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटीला सदिच्छा भेट
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची निशांत मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटीला सदिच्छा भेट
समता वार्ता वृत्तसंस्था कोपरगाव प्रतिनिधी– महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि समता नागरी सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी २५ ऑगस्ट २०२१ रोजी निशांत मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीला सदिच्छा भेट दिली त्यांच्या समवेत प्रसिद्ध उद्योजक व समता नागरी पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे, संस्थेचे अध्यक्ष व अकोला पूर्वचे आमदार श्री. रणधीर सावरकर, संचालक बजरंग तातीया, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बाभुळकर, मुख्यालयाचे अधिकारी, विविध शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पोहरे यांचे हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निशांत मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी, अधिकारी विविध शाखांचे शाखाधिका-र्यांशी संवाद साधताना काका कोयटे म्हणाले कि, सुरक्षित कर्ज वाढविण्यासाठी मार्केटिंगला अनन्यसाधारण महत्व असून मार्केटिंग करणे गरजेचे आहे. संस्थेच्या सभासदांना तत्पर सेवा देण्यासाठी शहराबरोबरच गाव पातळीवर देखील मार्केटिंग करून संस्थेने ग्रामीण भागातील सभासद ग्राहकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. संस्थेच्या वार्षिक आर्थिक पत्रकांवर समाधान व्यक्त करताना सुवर्ण तारण कर्ज वाटपावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर विशेष वेळ देऊन संस्थेच्या प्रत्यक्ष कामकाजामध्ये सहभागी होत असल्याने संस्था प्रगती पथावर आहे, याबद्दलही त्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री रणधीर सावरकर यांचे कौतुक केले.