समता पतसंस्थेकडून महाराष्ट्रातील शिक्षकांचा सन्मान
संपादक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे
समता पतसंस्थेकडून महाराष्ट्रातील शिक्षकांचा सन्मान
समता पतसंस्थेने शिक्षकांसाठी त्यांनी संस्थेच्या कोणत्याही शाखेत ठेवलेल्या ठेवींवर ८.२५℅ आकर्षक व्याजदराची योजना अंमलात आणून त्यांना सेवा दिली जात आहे तसेच संस्थेच्या प्रत्येक शाखेतील अधिकारी, कर्मचारी संस्थेचा सभासद असलेल्या व परिचयाच्या शिक्षकाच्या घरी प्रत्यक्षात जाऊन त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या
कोपरगाव : ग्राहक, सभासद,ठेवीदारांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबवून सर्व सभासदांचे हित जोपासत सेवा देणारी पतसंस्था म्हणून समता नागरी सहकारी पतसंस्थेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. त्याचप्रमाणेच ५ सप्टेंबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात मोठया उत्साहात साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून समता पतसंस्थेने शिक्षकांसाठी त्यांनी संस्थेच्या कोणत्याही शाखेत ठेवलेल्या ठेवींवर ८.२५℅ आकर्षक व्याजदराची योजना अंमलात आणून त्यांना सेवा दिली जात आहे तसेच संस्थेच्या प्रत्येक शाखेतील अधिकारी,कर्मचारी संस्थेचा सभासद असलेल्या व परिचयाच्या शिक्षकाच्या घरी प्रत्यक्षात जाऊन त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. तसेच शाळा महाविद्यालयात जाऊन देखील शिक्षकांचा यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून पाळण्यात येत असतो या दिवशी भारतातील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात येत असतो जसे कुंभार लहान मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुबक वस्तू तयार करतो त्याप्रमाणेच शिक्षक देखील एक लहान मुलाला विद्यार्थी आणि त्यानंतर सुसंस्कारी विद्यार्थी म्हणजेच अंगठ्याचे स्वाक्षरीत रूपांतर करण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करत असतात. त्यांनी प्रत्येकाच्या जीवनाला जगण्याची दिशा दिलेली असते. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे गरजेचे असते.
त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोपरगाव, गांधी चौक, शिर्डी, राहता, राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, येवला, वैजापूर नांदेड आदीं शाखा व सोनेतारण विस्ताररीत कक्षातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेत शाळा, महाविद्यालयात जाऊन तसेच काही शिक्षकांच्या प्रत्यक्षात घरी जाऊन योजना, उपक्रमांची माहिती दिली आणि त्यांचा सन्मान केला.