ब्रेकिंगमहाराष्ट्र

जो व्यक्ती विद्यार्थ्यांचे चारित्र्य क्षमता आणि भविष्य घडवितो तो खरा शिक्षक –  सौ. स्वाती कोयटे

संपादक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे

जो व्यक्ती विद्यार्थ्यांचे चारित्र्य क्षमता आणि भविष्य घडवितो तो खरा शिक्षक –  सौ. स्वाती कोयटे

कोपरगाव – शिक्षण क्षेत्रात शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थी यांना जोडणारा दुवा म्हणजे शिक्षक, शिक्षकाचे महत्वपूर्ण काम म्हणजे सुसंकृत, सुशिक्षित पिढी घडविणे. शिक्षक हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे. शिक्षक नवनवीन तत्वज्ञान, कौशल्य, आत्मसात करून एक आदर्श पिढी घडविण्याचे प्रामाणिक काम करत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याचे जीवनात शिक्षकाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे  शिक्षकांचा योग्य तो सन्मान करणे हे सुसंकृत,सुशिक्षित विद्यार्थ्याचे कर्तव्य असते. यासाठी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबर हा ‘जागतिक शिक्षक दिन’ म्हणुन पाळण्यात येत असतो. तसेच अध्यापन हा एक अतिशय उदात्त व्यवसाय असून जो त्या व्यक्तीचे चारित्र्य क्षमता आणि भविष्य घडवितो तोच खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणुन ओळखला जातो असे मत  समता इंटरनॅशनल स्कूल मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी व्यक्त केले.


समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर २०२१ रोजी इ.१० वी तील विद्यार्थी शिक्षक बनून अध्यापनाचे काम करत शैक्षणिक ज्ञानाबरोबरच आयुष्याचे तत्वज्ञान देणाऱ्या समता इंटरनॅशनल स्कूल मधील शिक्षकांचा यथोचित सन्मान करत सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये कोरोना काळातही प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयानुसार ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत एक तात्पुरती पर्यायी व्यवस्था स्वीकारली होती. कोणत्याही परिस्थितीत समता स्कूल मधील शिक्षक व शिक्षकाचे महत्व कमी होऊ दिले नाही. त्यामुळे आधुनिक शिक्षणाच्या आधारे प्रत्यक्ष शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे महत्वाचे काम समताचे शिक्षक करत होते. त्यामुळे समताच्या प्रत्येक विद्यार्थ्याने समताच्या प्रत्येक शिक्षकांना सदैव स्मरणात ठेऊन त्यांचा यथायोग्य आदरातिथ्य एका दिवसासाठी नाही, तर सदैव केले पाहिजे अशी इच्छा स्कूलचे मुख्य कार्यवाहक श्री.संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी व्यक्त केली.

जाहिरात

प्रसंगी इ.१० वी तील शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी स्कूलमधील सर्व शिक्षकांचा सत्कार करून आदर व्यक्त केला. या दिवशी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम करत अध्यापन आणि अध्ययन यातील फरक जाणून घेतला. सत्कार समारंभानंतर इ.७ वी तील विद्यार्थ्यांनी सुरेख नृत्य सादर केले. इ.१० वी तील आदिती भंडारी हिने हिंदी तर उन्नती भवर हिने इंग्रजी भाषेतून शिक्षकांविषयी विचार व्यक्त केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार इ.१० वी तील विद्यार्थी कुलदीप कोयटे, रक्षा दोषी, सिद्धांत जोशी, अन्वय बारहाते यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे तर मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक श्री.संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन, उपप्राचार्य समीर आत्तार यांची प्रमुख उपस्थितीत होती तर स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी इ.१० वी तील सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे