समतात प्रत्येक वर्षी श्री गणेशाची पूजा आणि आरती सभासदांच्या हस्ते
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समतात प्रत्येक वर्षी श्री गणेशाची पूजा आणि आरती सभासदांच्या हस्ते
कोपरगाव : अनेक वर्षाची परंपरा आहे की श्री गणपती व श्री महालक्ष्मीच्या दर्शनाचा दिवस म्हणजे गणेश चतुर्थीनंतरचा ४ था दिवस होय.गणेशजीची स्थापना केल्यानंतर चौथ्या दिवशी गणपती व महालक्ष्मीची पूजा केली जाते.अनेक सुवासिनी महिला ज्या ठिकाणी गणेशजींची स्थापना केलेली असते त्या ठिकाणी जाऊन महालक्ष्मी आणि गणेशजीची मनोभावे पूजा करून दर्शन घेत असतात.

त्याप्रमाणेच १३ सप्टेंबर रोजी समताच्या खातेदार, सभासद, ठेवीदार, कर्जदार,हितचिंतक आदींनी शाखेत आल्यानंतर दर्शन घेतले व पूजा केली तसेच त्याच्या हस्ते श्रींची सकाळ आणि संध्याकाळची आरती देखील करण्यात आली.
आज वैजापूर शाखेतील खातेदार श्री अर्जुन थोट यांच्या हस्ते सकाळची आणि श्री दत्तू चव्हाण यांच्या हस्ते संध्याकाळची आरती करण्यात आली.नाशिक शाखेतही ठेवीदार श्री विनोद डोंगरे यांनी सकाळी तर सौ वैष्णवी महेश पाटील यांनी संध्याकाळची आरती केली.खातेदार श्री दत्तात्रय मिरासे यांनी सकाळी तर संध्याकाळी जनमंगल प्रतिनिधी श्री जितेंद्र तापडिया यांच्या हस्ते नांदेड शाखेत आरती करण्यात आली.संस्थेचे ठेवीदार श्री व सौ खैरे यांच्या हस्ते सकाळी आणि संध्याकाळी सभासद श्री दातरंगे यांच्या हस्ते येवला शाखेत आरती करण्यात आली.
श्रीरामपूर शाखेतील ठेवीदार प्रविन भिकचंद गांधी, शिर्डीतील खातेदार मयूर शेळके,राहाता शाखेतील ठेवीदार शिवाजी देवढे, जामखेड शाखेतील मधुकर लोहकरे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.सर्व शाखेत आरतीनंतर उपस्थित,सभासद,ठेवीदार,कर्जदार,हितचिंतक, कर्मचारी आदींना श्रीं च्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.