सोनपावलांनी निवारा सोसायटीतील कशिदात गौरीचे आगमन
कोपरगाव : शुक्रवारी श्रींच्या आगमनानंतर रविवारी कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ सुहासिनी व श्री ओमप्रकाश दादाप्पा कोयटे आणि समता इंटरनॅशनल स्कूल च्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती व श्री संदीप ओमप्रकाश कोयटे यांच्या निवारा सोसायटीतील कशिदा निवासस्थानी सोनपावलांनी गौरीचे आगमन झाले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेष्ठा आणि कनिष्ठा गौरीच्या आशिर्वादाने वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या गणपती व महालक्ष्मी पूजा आणि दर्शनाचे आयोजन कशिदा निवासस्थानी १३ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी करण्यात करण्यात आले होते.
रविवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९:५० वाजता चंद्र अनुराधा नक्षत्रात प्रवेश करत असल्याने सकाळी ९:५० नंतर कशिदात गौरीचे आगमन झाले. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८:२३ नंतर चंद्राचा जेष्ठ नक्षत्रात गणपती व महालक्ष्मीची पूजा करण्यात आली.१४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०५ नंतर दिवसभरात सूर्यास्तापूर्वी गौरीचे विसर्जन करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी गौरी सोबत गणेशाचे ही विसर्जन करण्यात येते.
यावर्षी निसर्गावर आधारीत संरचना तयार करण्यात आली होती.
त्यावर आधारीत विविध फुलांची देखणी आरास, सुंदर मुखवटे,रुचकर खाद्यपदार्थ, विविध दागिन्यांनी नटवलेल्या मूर्ती आणि पारंपारिक रितिरिवाजामुळे आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते.निवारा परिसरातील महिला, समता स्कूल मधील शिक्षक,शिक्षिका आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी गणपती व महालक्ष्मीचे दर्शन घेतले.
