समता पतसंस्थेची आर्थिक स्थिती अति भक्कम गत ३ महिन्यांत ठेवीमध्ये २१ कोटी रुपयांची वाढ – श्री संदीप कोयटे,संचालक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता पतसंस्थेची आर्थिक स्थिती अति भक्कम गत ३ महिन्यात ठेवींमध्ये २१ कोटी रुपयांची वाढ – श्री संदीप कोयटे,संचालक
कोपरगाव– समता नागरी सहकारी पतसंस्था दरवर्षी ३१ मार्चला ज्याप्रमाणे आर्थिक पत्रके प्रसिद्ध करते, त्याप्रमाणे तिमाही स्थितीची आर्थिक पत्रके जाहीर करण्याची परंपरा संस्थेने चालू ठेवलेली आहे.त्यानुसार २०२२ सालची पहिल्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी प्रसिद्ध करताना समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे म्हणाले कि, ‘समताच्या ठेवींमध्ये गत तीन महिन्यात २१ कोटी रुपयांची वाढ झाल्याने ठेवी ६८२ कोटी रुपयापर्यंत जाऊन पोहचल्या आहेत.तसेच ५३६ कोटी रुपयांचे कर्जवाटप व तब्बल १८८ कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक करून समता पतसंस्थेची आर्थिक स्थिती अति भक्कम असल्याचे या आकडेवारीवरून जाहीर होत आहे.’
कर्ज वाटपामध्ये जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज हे २०० कोटी रुपयांच्या जवळपास पोहचले असल्याने संस्थेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असल्याचे संस्थेचे सरव्यवस्थापक श्री.सचिन भट्टड यांनी सांगितले.
समता पतसंस्थेच्या ठेवींवर ‘एनी टाईम लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाचे संरक्षण’ असल्याने या माध्यमातून ९९.४७ टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक श्री जितेंद्र कांतीलाल शहा यांनी जाहीर केले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानात समता पतसंस्थेने गत दोन वर्षात अतिवेगाने प्रगती केली असून व्हाऊचरलेस बँकिंग, पेपरलेस बँकिंग, फॉंरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम त्याचबरोबर आता ऑनलाईन अकौंट ओपनिंग देखील सुरु करून केवळ पतसंस्था चळवळी मध्येच नव्हे, तर भारतातील अत्याधुनिक बँकिंग चळवळीमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे.
समताची कर्ज वसुलीची पद्धत कठोर परंतु कायदेशीर असल्याने थकबाकीदार दुखावतात परंतु या कठोर वसुलीमुळेच संस्थेचा एन.पी.ए. कमी होऊन ठेवीदारांच्या ठेवींची सुरक्षितता वाढत असते.प्रसंगी थकबाकीदारांशी वाईटपणा घेऊन देखील ठेवींच्या सुरक्षिततेसाठी कठोर वसुली करण्याचा वसुली पॅटर्न समताने गेली ३६ वर्षे कटाक्षाने पाळला आहे.
सोनेतारण कर्ज वाटपात कोणत्याही प्रकारचे वसुलीसाठी कारवाई करावी लागत नसल्याने तसेच ज्या तारणावर कर्ज दिले जाते तो तारण माल संस्थेच्या ताब्यात असल्याने कर्ज वसुलीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. सोने तारणावर सोन्याच्या मूल्यावर जास्तीत जास्त कर्ज देऊन कमीत-कमी व्याजदर व अतितत्पर सेवा याद्वारे समताने सोनेतारण कर्जात उच्चांक प्रस्थापित केला आहे.
समता पतसंस्थेच्या ठेवीदारांमध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने याच महिन्यात जेष्ठ नागरिकांसाठी ‘आनंदी जीवन कसे जगावे व आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी संतुलित आहार कसा घ्यावा’ या विषयावर कोपरगाव येथील सुप्रसिध्द डॉ.अभिजित आचार्य तसेच पुणे येथील सुप्रसिध्द डॉ. अशोकजी देशमुख यांची व्याख्याने आयोजित केलेली आहे. ही व्याख्याने सोमवार दि.११ जुलै रोजी अहमदनगर, मंगळवार दि.१२ जुलै रोजी श्रीरामपूर व बुधवार दि.१३ जुलै रोजी कोपरगाव या ठिकाणी आयोजित केली आहेत. या व्याख्यानाचा सर्व जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले आहे.