समताची बँकिंग सेवा आणि योजना,उपक्रमांची माहिती घराघरातच नव्हे तर महिलांच्या स्वयंपाक घरात जाऊन दिली जाते – काका कोयटे
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समताची बँकिंग सेवा आणि योजना,उपक्रमांची माहिती घराघरातच नव्हे तर महिलांच्या स्वयंपाक घरात जाऊन दिली जाते – काका कोयटे
कोपरगाव : महाराष्ट्रात १ हजार कोटींचा संमिश्र व्यवसाय करत संस्थेच्या प्रत्येक ग्राहक,सभासद,ठेवीदार,कर्जदार आदींना समताच्या योजना आणि उपक्रमाची सखोल माहिती व्हावी आणि त्यांच्यासाठी या योजना व उपक्रम हिताचे ठरावे या दृष्टीने समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ,पदाधिकारी,अधिकारी आणि कर्मचारी सतत प्रामाणिकपणे बँकींग सेवा देत असतात.विशेषतः राहाता शाखेच्या लेखापाल श्रीमती अनिता प्रवीण बागडे यांनी सभासदांच्या घराघरात बँकिंग सेवा दिलीच त्याचबरोबर स्वयंपाक घरात जाऊन देखील महिलांना बँकींग सेवा दिली.समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी घरपोहोच बँकिंग सेवा पोहचविण्याचे अविरतपणे काम करत आहे त्याच बरोबर समताच्या प्रत्येक सभासदांपर्यंत संस्थेच्या योजना आणि उपक्रम पोहचविण्याचे काम करत असतात. संस्थेच्या ग्राहक, सभासद, हितचिंतक असलेल्या महिलांच्या स्वयंपाक घरात देखील बँकिंग सेवा समताच्या महिला कर्मचाऱ्यांनी पोहचविल्या आहेत, कारण की महिलांवर असलेली संसाराची जबाबदारी त्या जबाबदारीतून त्यांना बाहेर येण्यासाठी वेळ भेटणे कठीणच असते त्यामुळे एक महिला म्हणून त्या महिलांच्या अडचणी ओळखून समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या महिला कर्मचारी संस्थेच्या योजना आणि उपक्रमांची माहिती, बँकिंग सेेवा ग्रामीण भागातील सभासद महिलांच्या स्वयंपाक घरात जाऊन पोहचल्या असून महिलांच्या प्रगतीच्या दृष्टीने ही जमेची बाजू असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.