गोदावरीच्या तिरी माझी समता – दिलीप फिलिप तेलोरे,कवी
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
! गोदावरीच्या तिरी माझी समता !
समता नागरी सहकारी पतसंस्था,
हे आर्थिक क्षेत्रातील एक मोठे नाव आहे,
संथ वाहणाऱ्या गोदावरीच्या काठावर,
माझ्या समताचे माहेर कोपरगाव आहे !!१!!
एका छोट्या रोपट्याच रूपांतर,
आज मोठ्या वटवृक्षात बहरलय,
असे सक्षम,मजबुत कवच समतेला,
फक्त काकासाहेबांमुळेच लाभलंय !!२!!
सम विचारांचे तज्ज्ञ संचालक मंडळ,
सर्वाना सोबत घेऊन चालणारे आहे,
समताला क्षितीजाच्या पलिकडे न्यायचे,
असे सत्य स्वप्न नयनी पाहणारे आहे !!३!!
राष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहार करत सेवा देणारी,
माझी समता प्रमुख पतसंस्था आहे,
समाजातील दुर्बल घटक ते गरजूंच्या विकासासाठी धावणारी,
समता ही माता ही आहे !!४!!
माहिती अन तंत्रज्ञानाच्या युगात,
समताने टाकलेले हे एक पाऊल आहे,
म्हणूनच आता दिल्ली फार दूर नाही,
कारण आकाशाला स्पर्श होण्याची ही एक चाहुलच आहे !!५!!
म्हणूनच आमचा दृष्टीकोन जगाला मार्गदर्शक ठरेल,
अशी सर्वोत्तम संस्था आम्हाला घडवायची आहे,
आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरीने,
आम्हाला स्नेहाची नाती जोडायची आहे !!६!!
जेव्हा एखाद्या गडकिल्ले समान शोभून दिसते समता माझी,
गोदावरी मातेच्या काठावर दिसतो तेव्हा विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता,
हिच शब्दसुमनं येतात हर ग्राहकांच्या ओठांवरती !!७!!
कवी – दिलीप फिलीप तेलोरे (लिपिक)
श्रीरामपूर शाखा.