समताची मूल्ये आणि दृष्टीकोन आत्मसात करून प्रत्येक कर्मचारी सभासदांना सेवा देत आहे – काका कोयटे ; शिर्डीत समताची सहामाही आढावा बैठक संपन्न
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समताची मूल्ये आणि दृष्टीकोन आत्मसात करून प्रत्येक कर्मचारी सभासदांना सेवा देत आहे – काका कोयटे ; शिर्डीत समताची सहामाही आढावा बैठक संपन्न
कोपरगाव : समता पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने समताची मूल्ये आणि दृष्टीकोन आत्मसात करून सभासदांना प्रामाणिक सेवा देत समताचे नाव उंच शिखरावर पोहचविले असल्याने संस्थेच्या प्रगतीत कर्मचारी हा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे बदलत्या काळानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याने बदल स्वीकारायला हवा तसेच कर्मचाऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी संस्थेने विशेष योजना अंमलात आणलेल्या आहे.या योजनांच्या अनुषंगाने संस्थेच्या प्रगतीबरोबर स्वतःची देखील प्रगती साधावी. असे प्रतिपादन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेची २०२०-२१ ची सहामाही आढावा बैठक शिर्डी येथील साई तीर्थ या ठिकाणी ९ ऑक्टोबर २०२१ रोजी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
आढावा बैठकीचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांनी केले.ते म्हणाले की,समताच्या मुख्य कार्यालयातील विभागासह प्रत्येक शाखेचा सहामाही आढावा हा कौतुकास्पद असून अनेक शाखांनी ठेवी,कर्ज,सोनेतारण, कासा प्रणालीत विशेष कामगिरी केली आहे.त्यांनी केलेली कामगिरी ही समताच्या मुल्यांचा प्रत्येक कर्मचाऱ्याने केलेला अंगिकार आहे. संख्यात्मक कर्जवाटप न करता गुणात्मक कर्ज वाटप,ठेवींना सुरक्षितता,विविध योजना व उपक्रम,कर्मचाऱ्यांचा दर्जा या बाबींचे अनुकरण करून समताची मूल्ये व दृष्टीकोनाच्या आधारे पतसंस्था चळवळीत समताला प्रमुख पतसंस्था बनवायचे आहे.
समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री जितुभाई शहा,अंतर्गत ऑडीटर स्वप्नील घन, मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी,अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर बैठकीत ३१ मार्च २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुख्य कार्यालयातील विविध विभागासह संस्थेच्या इतर शाखांनी ठेवी, कर्ज,सोनेतारण,कासा डिपॉझिटच्या माध्यमातून केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा चित्रफितीच्या माध्यमातून घेण्यात आला. मुख्य कार्यालयाचे एच.आर श्रीमती उज्वला बोरावके, ठेव व ऑडिट विभाग प्रमुख श्री संजय पारखे,कर्ज विभाग प्रमुख श्री निलेश देशमाने, फंड विभाग प्रमुख श्री जितेंद्र अमृतकर,वसुली विभाग प्रमुख श्री जनार्दन कदम, ईडीपी विभाग प्रमुख श्री योगेश आसने, बोर्ड सेक्रेटरी श्री संतोष मुदबखे,प्रसिद्धी विभाग प्रमुख श्री पोपट साळवे आदींनी त्यांच्या विभागाचा चढता आलेख चित्रफितीच्या माध्यमातून सादर केला.
ठेवी,कर्ज,सोनेतारण,कासा डिपॉझिट मध्ये विशेष प्रगती करणाऱ्या राहाता शाखेचा संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सोनेतारणामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या शाखांमध्ये वैजापूर,येवला आणि राहाता यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल संचालक श्री जितुभाई शहा,श्री संदीप कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर सोनेतारण विस्तारीत कक्षांपैकी सोनेतारण कर्ज वाढीमध्ये पैठण,जामखेड,पिंपळगाव यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय मिळविल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कर्मचाऱ्यांना वाहन कर्ज आणि गृह कर्जावर ०℅ व्याजदराच्या अनुषंगाने कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक श्री जितुभाई शहा यांनी सांगितले.
त्यानंतर समताच्या मूल्यांवर आधारीत प्रत्येक शाखांना प्रश्न विचारून प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत यशस्वी झालेल्या शाखांचा संस्थेचे अंतर्गत ऑडिटर श्री स्वप्निल घन, वसुली अधिकारी श्री जनार्दन कदम, ठेवी प्रमुख श्री संजय पारखे यांच्या हस्ते सत्कार करून बक्षिसे देण्यात आली.आढावा बैठकीचे नियोजन समताचे संचालक श्री संदीप कोयटे, जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. बैठकीचे सुत्रसंचालन जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री संजय पारखे यांनी मानले.