सभासदांसोबतच पतसंस्थांनाही अडचणीच्या काळात मदत करणारी समता – श्री शिवाजी पोटे,चेअरमन
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
सभासदांसोबतच पतसंस्थांनाही अडचणीच्या काळात मदत करणारी समता – श्री शिवाजी पोटे,चेअरमन
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्था काकांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक प्रगती करत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना तत्पर सेवा देत आहे.समताचे सभासद असलेले छोटे-मोठे व्यापाऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक साहाय्य करून समृद्ध बनवत आहे तसेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या पतसंस्थांना देखील आर्थिक साहाय्य करून आर्थिक संकटातून बाहेर काढणारी समता पतसंस्था आहे,कारण की २०१६ मध्ये काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला देखील आर्थिक साहाय्य केले होते आणि आजही अडचणीत आलेल्या पतसंस्थांना परिस्थितीनुरूप आर्थिक साहाय्य करण्याची तयारी काका दाखवतात.असे प्रतिपादन एच.ए.एल.कर्मचारी को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री शिवाजी पोटे यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील एच.ए.एल.कर्मचारी को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री शिवाजी पोटे, व्हा. चेअरमन श्री चिंतामण थिटे,संचालक श्री हेमंत अहिरराव,श्री अझुन लोणे, श्री जयंत मेढणे,श्री संजय मोरे आदींनी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी सदिच्छा भेट दिली.
सदिच्छा भेटीप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.संस्थेचे जेष्ठ संचालक श्री जितुभाई शहा,जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड उपस्थित होते.
समताचे आधुनिक तंत्रज्ञान,विविध योजना,उपक्रम, सभासदांना दिली जाणारी तत्पर सेवांविषयी तसेच पतसंस्थेच्या अनुषंगाने सहकारातील विविध विषयांवर संस्थेचे चेअरमन आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्याशी चर्चा करून समताच्या कामकाजाची प्रत्यक्षात माहिती घेतली. समता पतसंस्थेविषयी मिळालेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी यांनी दिलेल्या अनमोल माहिती आणि बहुमोल वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.