खास चिमुकल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी समताकडून बाल गौरव ठेव योजना
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
खास चिमुकल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी समताकडून बाल गौरव ठेव योजना
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्था सभासदांसाठी नेहमीच नवनवीन योजना, उपक्रम राबवून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारा कमी वेळेत सुलभ सेवा देणारी पतसंस्था म्हणून महाराष्ट्राला परिचित असून ११०० कोटींचा संमिश्र व्यवसाय करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे.
समता कुटुंब कल्याण योजना, जेष्ठ नागरीक योजना आदींसारख्या सभासदांचे भविष्य उज्वल करणाऱ्या योजनांबरोबरच सभासदांसाठी विविध योजना अंमलात आणून सभासदांचे हित जोपासत असते. दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन जागतिक बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून समतातर्फे प्रत्येक वर्षी आकर्षक व्याजदर देऊन बाल गौरव ठेव योजना राबविली जात असते. त्याचप्रमाणे या ही वर्षी १ नोव्हेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी बाल गौरव ठेव योजना सुरू करण्यात आली असून १८ महिन्यांच्या मुदत ठेवीवर ८.५०℅ आकर्षक व्याजदर देऊन बालकांसाठी लहान मुलांच्या उज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी योजना अंमलात आणली असून समताच्या प्रत्येक शाखेत राबविली जात आहे.
सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ०८०६९१६५५५५ या क्रमांकावर संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त सभासद, ग्राहकांनी लाभ घ्यावा.