समता परिवाराचे प्रेम हे कधी ही न विसरता येणारे – श्री चांगदेव शिरोडे, जेष्ठ संचालक
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समता परिवाराचे प्रेम हे कधी ही न विसरता येणारे – श्री चांगदेव शिरोडे, जेष्ठ संचालक
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेपासून काकांच्या सोबत असून त्यांच्या प्रत्येक निर्णयावर एक ठाम भूमिका मी मांडत आलेलो असून इथून पुढेही त्यांच्या संस्था, सभासदांच्या निर्णयावर योग्य ती ठाम भूमिका मांडून संस्था,सभासदांसाठी हिताचे निर्णय घेतले जातील तसेच समता परिवाराने आज पर्यंत माझ्यावर केलेले प्रेम हे न विसरण्यासारखे आहे कारण माझ्या शाळेच्या जन्म प्रमाणपत्रावर ३० फेब्रुवारी असा उल्लेख तेव्हाच्या शिक्षकांकडून झाल्यामुळे माझा वाढदिवसच येत नव्हता पण माझी खरी असलेल्या जन्मतारखेनुसार आज पहिलाच वाढदिवस साजरा झाला आहे.
तसेच संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या संस्थेने ११०० कोटींचा संमिश्र व्यवसाय केलेला असून ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारा दिल्या जाणाऱ्या तत्पर सेवेमुळे महाराष्ट्रात अग्रभागी आहे. याचे सारे श्रेय समताचे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यालयाचे अधिकारी,शाखाधिकारी,कर्मचारी असल्याचे मत समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री चांगदेव शिरोडे यांनी व्यक्त केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेत ७ नोव्हेंबर रोजी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, माजी चेअरमन श्री अशोक दरक,जेष्ठ संचालक सर्वश्री अरविंदजी पटेल, संदीप कोयटे, गुलशन होडे, दीपक अग्रवाल, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आदींच्या उपस्थितीत संस्थेचे जेष्ठ संचालक श्री चांगदेव शिरोडे यांचा ६३ वा वाढदिवस संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते शाल व समता महिला बचत गटाने अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून बनविलेला गुच्छ देत सत्कार करून उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, संचालक श्री अरविंदजी पटेल यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत त्यांचा शांत स्वभाव आणि संस्थेविषयी तसेच छोटे-मोठे व्यापारी, किराणा दुकानदार यांच्या विषयी घेण्यात येणारे ठाम निर्णय या भूमिकेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.संस्थेचे जेष्ठ संचालक श्री अरविंदजी पटेल यांनी सत्कारानंतर श्री चांगदेव शिरोडे यांना पेढा भरविला.तर कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री आप्पासाहेब कोल्हे, समताचे प्रसिद्धी विभाग प्रमुख श्री पोपट साळवे,कोपरगाव शाखेचे श्री महेश भावसार आदींनी मनोगत व्यक्त करत अनुभव कथन केले तर मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कोपरगाव शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार मुख्य कार्यालयाच्या एच.आर श्रीमती उज्वला बोरावके यांनी मानले.