संदीप कोयटे हे परीस आहे – श्री.अरविंद पटेल, ज्येष्ठ संचालक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
संदीप कोयटे हे परीस आहे – श्री.अरविंद पटेल, ज्येष्ठ संचालक
कोपरगाव : समता पतसंस्थेच्या प्रगतीत तरुण संचालकांचा सहभाग अधिक असून नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून सभासदांना सेवा देण्याचा त्यांचा मानस असतो.संस्थेच्या तरुण संचालकांनी संचालक संदीप कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाखेत ठेवी, कर्जात वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केलेले आहे.त्यातीलच सोनेतारण कर्ज हे कमी कालावधीत सुरक्षित सोनेतारण कर्ज अशी ओळख त्यांनी करून दिली आहे.त्यामुळे संदीप कोयटे हे समता पतसंस्थेचे संचालकच नाही तर ते एक परिस आहे. त्यांनी संस्थेच्या सोने तारण कर्ज प्रकाराकडे अधिक लक्ष दिल्याने त्याला झळाळीच आली आहे.तसेच सुधन गोल्ड लोन ही प्रणाली ४ राज्यात कार्यान्वित केली असून त्या माध्यमातून सोनेतारण कर्जाचा ६५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यांच्यामुळे समताचे तरुण संचालक हे उज्वल भविष्य आहे.असे गौरोद्गार समता पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. अरविंद पटेल यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांचा ४१ वा वाढदिवस संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल, जितुभाई शहा, रामचंद्र बागरेचा, कचरू मोकळ , गुलशन होडे, किरण शिरोडे, दिपक अग्रवाल, भरत अजमेरे, अनुप पटेल, जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. संचालक अरविंद पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत चेअरमन काका कोयटे आणि उपस्थितांनी पेढा भरवत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांनी ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच चेअरमन काका कोयटे आणि उपस्थितांच्या हस्ते १ हजार कोटी रुपयांच्या ठेवीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना संदीप कोयटे म्हणाले की, मला एवढी अपेक्षा नव्हती की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात माझा वाढदिवस साजरा होणार आहे. संस्थेचे चेअरमन आणि जेष्ठ संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली समता पतसंस्थेची आर्थिक प्रगती आम्ही सर्व तरुण संचालक, अधिकारी, कर्मचारी करत आहोत. समताची ही आर्थिक घोडदौड त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालूच ठेवणार आहोत. आज समताच्या १ हजार कोटी रुपयांच्या ठेवी पूर्ण करण्याचा संकल्प सर्व अधिकारी , शाखाधिकारी, कर्मचारी यांनी केला आहे तो देखील आपण सर्व जण वेळेच्या आधी पूर्ण करून अजून एक समताचा विक्रम प्रस्थापित करूया.
प्रसंगी मुख्य कार्यालयाचे जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड, संजय पारखे, गौतम खंडिझोड, शाखाधिकारी आप्पा कोल्हे, मिलिंद बनकर, संजय मोरे, राजेश महाजन, महेश भावसार आदींनी मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार एच.आर उज्वला बोरावके यांनी मानले.