ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता पतसंस्थेचे व्यवस्थापन पतसंस्था चळवळीला दिशादर्शक- श्री संभाजी औटी, चेअरमन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्थेचे व्यवस्थापन पतसंस्था चळवळीला दिशादर्शक – श्री संभाजी औटी, चेअरमन

कोपरगाव : अत्याधुनिक तंत्रज्ञान व सभासदांना तत्पर सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापन हे सहकार चळवळीतील पतसंस्थांना दिशादर्शक असून काकांच्या नेतृत्वाखाली समता पतसंस्था अजून उंच भरारी घेईल.असे गौरवोद्गार छत्रपती संभाजीराजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री संभाजी औटी यांनी काढले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास १८ मार्च २०२२ रोजी पारनेर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री संभाजी औटी, शाखाधिकारी सर्व श्री विकास भालेराव,सुरेश ठुबे,विशाल रोकडे,योगेश पवार,लिपिक सर्व श्री मनोज जाधव,स्वप्नील ढगे, रविंद्र बोरुडे आदी पदाधिकाऱ्यांसह शिक्षक समिती गुरुकुल मंडळ अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री अशोक कानडे यांनी सदिच्छा भेट दिली.

प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज भव्य इमारत,आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड,फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न,सोनेतारण विभाग, समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती,घी बत्ती कापूर,हँडवॉश,उटणे,फुलवाती, समई वाती,अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ,मास्क,पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा करून संस्थेचे चेअरमन काका कोयटे,पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी यांनी सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री संभाजी औटी व शिक्षक समिती गुरुकुल मंडळ अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री अशोक कानडे यांचा सत्कार समता महिला बचत गटाने अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ देऊन करण्यात आला.तसेच छत्रपती पतसंस्थेच्यावतीने चेअरमन श्री संभाजी औटी यांच्या हस्ते समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेली अनमोल माहिती आणि बहुमोल वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे