ब्रेकिंगमहाराष्ट्र

समतातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा समताच्या व्यवहारातील पारदर्शकतेत दिसतो- सौ सुनंदा पवार,भीमथडी जत्रा संयोजिका

समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

 

समतातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा समताच्या व्यवहारातील पारदर्शकतेत दिसतो- सौ सुनंदा पवार,भीमथडी जत्रा संयोजिका

जामखेड शहरात समता पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन

कोपरगाव – समता नागरी सहकारी पतसंस्थेने संपुर्ण महाराष्ट्रात जाळे विणले आहे.जामखेड शहरातील शाखा उद्घाटनामुळे जामखेडकरांच्या व्यवहाराला एक पर्याय उपलब्ध करून दिला असून जामखेडकरांसाठी सुवर्ण संधी आहे.ग्राहकांना अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तत्पर सेवा देणारी व सभासद हित ओळखून त्यांना विविध योजना व उपक्रमांमधून आर्थिक फायदा करून देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे.समतातील आधुनिक तंत्रज्ञान हे कौतुकास्पद असून त्यामुळे समताच्या व्यवहारातील पारदर्शकता पाहायला मिळते.असे प्रतिपादन भीमथडी जत्रा संयोजिका सौ.सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी केले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की,समता पतसंस्था संचलित समता महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी उद्योगाचे जाळे कोपरगावात सुरू केले आहे.त्या प्रमाणेच जामखेडमधील महिला बचत गटाच्या महिलांनाही काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू.अशी इच्छा व्यक्त केली.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन जामखेड शहरात २३ फेब्रुवारी २०२२ रोजी भीमथडी जत्रा संयोजिका सौ.सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्या सौ सुनंदाताई पवार यांचा सत्कार समता महिला गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कोठारी,ज्योती क्रांती क्रेडीट सोसायटीचे चेअरमन आजिनाथ हजारे, संस्थेचे जेष्ठ संचालक श्री जितुभाई शहा यांच्या हस्ते पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचालक अशोक शिंगवी,संत गोरोबाकाका कुंभार पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत,विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र राळेभात,जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांच्या हस्ते एच.यु.गुगळे पतसंस्थेचे चेअरमन रमेश गुगळे,प्रतिष्ठीत व्यापारी महेश नगरे, मधुकर लोहकरे,सोनेतारण व्हॅल्यूअर श्रीकांत कुलथे,असि.जनरल मॅनेजर श्री संजय पारखे यांच्या हस्ते जामखेड नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण चिंतामणी,श्री.दत्तात्रय वारे, श्री.सुरेश भोसले,माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण तर कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री आप्पा कोल्हे यांच्या हस्ते राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भानुदास बोराडे,खर्डा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवकुमार गुळवे आदी प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले कि, समता नागरी सहकारी पतसंस्थेने १२०० कोटी रुपयांच्या पुढे संमिश्र व्यवसाय केला आहे.१४ फेब्रुवारी २०२२ अखेर संस्थेच्या ठेवी ६४३ कोटी, कर्ज ४९७ कोटी ३१ लाख, सोनेतारण कर्ज १५५ कोटी आहे.अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी अंतर्गत समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन योजनेत समताच्या ९९.०२℅ ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहे.गेल्या २ वर्षापासून जामखेडमध्ये आधी १० कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला आणि एक पैशाची ठेव गोळा न करता आधी सोनेतारण कर्जपुरवठा केला आणि नंतर जामखेडकरांच्या आग्रहास्तव, त्यांना प्रामाणिकपणे सेवा देणे सुलभ व्हावे त्यामुळे समता पतसंस्थेच्या परिपूर्ण शाखेत रूपांतर करत आहोत. जामखेडकरांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे त्यांनी आमच्याशी केलेल्या व्यवहाराला सुरक्षितता प्रदान करण्याचे महत्वपूर्ण काम करणार आहोत.

प्रसंगी प्रमुख उपस्थितांपैकी श्री राजेंद्र कोठारी, श्री अशोक सिंगवी,श्री रमेश गुगळे यांनी मनोगतातून समता पतसंस्थेच्याच्या कामकाजाचे कौतुक करत जामखेड शहरात काकांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्था चळवळ मजबूत करूयात.असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे यांनी केले. उद्घाटनपर कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी जामखेड शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे