ब्रेकिंगमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणतालिकेत समताचे विद्यार्थी – सौ स्वाती कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी; समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अद्वितीय यश

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणतालिकेत समताचे विद्यार्थी – सौ स्वाती कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी;

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अद्वितीय यश

कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असते.कृतीयुक्त शिक्षण प्रणाली व विद्यार्थी केंद्रीत नवनवीन उपक्रमांमुळे अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावलौकिक मिळवत आहे हे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाने सिद्ध झाले आहे.एस.ओ. एफ द्वारा आयोजित इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड (आय.एम.ओ.)परीक्षेच्या निकालात आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये प्रथम,व्दितीय आणि चतुर्थ क्रमांकासह २५ सुवर्ण पदकांची कमाई करत अद्वितीय यश संपादन केले असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती संदीप कोयटे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत प्रथम क्रमांक निभीष सरवार,द्वितीय क्रमांक इप्सिता राय आणि चतुर्थ क्रमांक केशमा खुराणा यांनी मिळवत सुवर्णपदके मिळविली तर मल्हार जपे,ईश्वरी महाजन,जनिशा डमरे यांनी विशेष प्रविण्यासह सुवर्ण पदके मिळविली तर कौस्तुभ शेळके,नमन सुराणा,सर्वदा सिन्हा सिन्हा,भूमी रोकडे,ओजस तांबे,स्वरा ठोकळ,आदिश आचार्य,अनवी बागडे,सृष्टी वक्ते,रुद्र राठोड,समर्थ हजारे,आर्यन सिन्हा,वेदांत परदेशी,राजेश्वरी तांबे,दर्शिल अजमेरा,मनस्वी आढाव,रोहन दहिया, वृष्टी कोठारी,अथर्व बेरगळ आदी विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गणित विभाग प्रमुख श्री आकाश मिश्रा,सहशिक्षक श्री हर्षद निबे,सौ.कविता पाटील,सौ.जलीस शाद,सौ प्रियंका चरपे,स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री अनिस शेख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले

आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत प्रथम क्रमांक निभीष सरवार,द्वितीय क्रमांक इप्सिता राय आणि चतुर्थ क्रमांक केशमा खुराणा

समताचे मल्हार जपे,ईश्वरी महाजन,जनिशा डमरे यांनी विशेष प्रविण्यासह सुवर्ण पदके मिळविली

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समता स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाह श्री संदीप कोयटे,शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन,उपप्राचार्य श्री समीर अत्तार,पर्यवेक्षिका सौ सारिका अग्रवाल,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे