ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता पतसंस्था एक प्रयोग शाळा – सौ.नीलिमा बावणे, चेअरमन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्था एक प्रयोग शाळा – सौ.नीलिमा बावणे, चेअरमन

कोपरगाव– समता पतसंस्था आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहक सभासदांसाठी विविध योजना व उपक्रम संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन प्रयोग करून सभासदांसाठी अंमलात आणतात.या वेगवेगळ्या प्रयोगांमधून सभासदांना तत्पर सेवा देता येते.नवीन ग्राहक देखील वेग – वेगळ्या प्रयोगांमुळे समताकडे आकर्षित होऊन भेट देत असतात.त्यामुळे समता पतसंस्थ एक प्रयोग शाळा आहे.असे मत महाराष्ट्रात १५०० कोटी रूपये ठेवी असलेल्या नागपूर येथील दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को- ऑप.सोसायटीच्या चेअरमन सौ.नीलिमा बावणे यांनी व्यक्त केले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटीच्या चेअरमन सौ.नीलिमा बावणे, संचालिका सौ.सीमा वाघमारे आणि कल्पतरू महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अधिकारी सौ.अपूर्वा चिवाटे,सौ.दिशा आदमने,सौ.अमृता नशीने आदि महिला पदाधिकारी, अधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली.

प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेचे आधुनिक तंत्रज्ञान, विविध योजना व उपक्रम,फॉंरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम,व्हाऊचर लेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड,समता रिकव्हरी पॅटर्न, सोने तारण विभाग आणि समता महिला बचतगटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती,घी बत्ती,कापूर,हँडवॉश,उटणे, फुलवाती, समईवाती,मास्क,पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध उत्पादनांविषयी चर्चा करून संस्थेचे चेअरमन काका कोयटे,पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांनी सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटीच्या चेअरमन सौ.नीलिमा बावणे यांचा सत्कार अहमदनगर जिल्हा अनुसुचित जाती महिला विभाग जिल्हाध्यक्षा सौ.सविता विधाते,संचालिका सौ.सीमा वाघमारे यांचा सत्कार समता महिला गटाच्या सौ.आशा भिंगले, कल्पतरू महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अधिकारी सौ.अपूर्वा चिवाटे व सौ.दिशा आदमने यांचा सत्कार सौ.आशा दुसाने तर सौ.अमृता नशीने यांचा सत्कार सौ. कोमल गंगवाल यांनी समता महिला बचत गटाने अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ देऊन केला.

उपस्थित पदाधिकारी व अधिकारी यांना समता पतसंस्था, समता उद्योग मंदिर आणि समताज सहकार मिनी मॉल विषयी मिळालेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त करत समताचे अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेली अनमोल माहिती व बहुमोल वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणि समताच्या पुढील आर्थिक वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे