ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायात १३६ कोटी रुपयांची वाढ – श्री संदीप कोयटे,संचालक

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायात १३६ कोटी रुपयांची वाढ – श्री संदीप कोयटे,संचालक

कोपरगाव– समता पतसंस्थेच्या ३६ वर्षाच्या वाटचालीत ६६२ कोटी रुपयांच्या ठेवी व ५२६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप यासह ११८८ कोटी रुपयांच्या संमिश्र व्यवसाय असणाऱ्या  समता पतसंस्थेचा २०२२ चा आर्थिक अहवाल सालाबादप्रमाणे याही वर्षी दुपारी ३.०० वा. प्रसिद्ध करण्यात येऊन समता पतसंस्थेने ३१ मार्च ला अहवाल प्रसिद्ध करण्याची परंपरा कायम राखली असून समता पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायात १३६ कोटी रुपयांची वाढ झाली असल्याने समताने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत एक वेगळा नावलौकिक मिळविला आहे. विशेषतः गत दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनच्या काळात हि वाढ झाल्याने संस्थेचे संचालक श्री.संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सभासद व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले आहे.

तसेच समता पतसंस्थेने वसुली बाबतही आघाडी कायम राखली असून संस्थेच्या शाखांपैकी वैजापूर, राहुरी, राहाता, पुणे, गांधी चौक  या शाखांनी 0% एन.पी.ए. राखण्यात यश मिळविले आहे.  तर शिर्डी, नाशिक, येवला  यांनी ०.५ टक्का  एन.पी.ए. राखला आहे.इतर शाखा अल्प एन.पी.ए.राखण्यात यशस्वी झाल्या आहेत.

समता पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ रोजी ११८८ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला असून ठेवींमध्ये तब्बल ६२ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी ६६२ कोटी रुपये एवढ्या झाल्या तसेच कर्ज वाटपामध्ये ७२ कोटी रुपयांची वाढ होऊन संस्थेचे एकूण कर्ज वाटप ५२६ कोटी एवढे झाले असून गुंतवणुक १७५ कोटी एवढी आहे.  संस्थेला  ३१ मार्च २०२२ अखेर ७ कोटी २५ लाख इतका नफा झालेला आहे  अशी माहिती संस्थेचे संचालक श्री. संदीप कोयटे  यांनी दिली.
याबाबत अधिक बोलताना ते पुढे म्हणाले कि, ‘गत दोन वर्षापासून लॉकडाऊन जाहीर झाला असल्यामुळे महाराष्ट्राच्या बाजारपेठा ठप्प झाल्या आहे. त्याचा परिणाम सर्वांच्याच व्यवहारांवर झाला असताना देखील समताने ठेव वाढ, कर्ज वाढ व गुंतवणूक यामध्ये विविध विक्रम प्रस्थापीत केले आहे. विशेषतः बँकिंग क्षेत्रातील कर्ज वाटपापैकी  अत्यंत सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज हे जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे, समताचे सोनेतारण कर्ज दि.३१ मार्च २०२१ अखेर ९३ कोटी रुपये इतके होते, त्यात तब्बल ७९ कोटी रुपयांची वाढ होऊन ते आता १७१ कोटी रुपयांपर्यंत  पोहोचले आहे. सोने तारण कर्जामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून जलद सेवा ग्राहकांना देण्याचे काम समता पतसंस्था करीत आहे.’ त्याचबरोबर सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी देखील विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्था  सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन हे कामकाज बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.

समता पतसंस्थेची एकूण सुरक्षित गुंतवणूक १७५ कोटी रुपयांची असून कॅश व बँक बॅलन्स ६ कोटी  रुपयांचा आहे. समताने आपल्या ग्राहकांना २८ कोटी  रुपयांचे ठेव तारण कर्ज व सोनेतारण कर्ज १७१ कोटी  रुपयांचे आहे. संस्थेच्या गुंतवणुकीचे प्रमाण ठेवींच्या प्रमाणात २६.४३% इतके आहे. सोने तारण कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या प्रमाणात ३२.५०% इतके आहे. संस्थेची सुरक्षित गुंतवणूक आणि सोनेतारणासारखे अति सुरक्षित कर्ज याचे एकूण ठेवींशी प्रमाण ५८.७६% इतके आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक व तरलता कर्जाच्या आधारावर समताच्या ९९.१३% ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहे. तसेच समताच्या ठेवीदारांच्या प्रत्येकी १२.५० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहे.बँकांच्या ठेवींना ५ लाख रुपयांपर्यंतच्या सुरक्षितता असल्याने  समताच्या ठेवींविषयी ही  बाब विशेष उल्लेखनीय समजली जाते.

समताने केवळ कर्ज वाटप न करता मायक्रो फायनान्सने दिलेल्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालास, स्वदेशी उत्पादनास भारतभर ऑनलाईन विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार उद्यमीच्या माध्यमातून ‘सहकार उद्योग मंदिर व समता सहकार मिनी मॉल’ अंतर्गत स्थानिक तसेच स्वदेशी उत्पादने उपलब्ध करून दिली आहे. समता महिला बचत गटाद्वारा समता सहकार मिनी मॉल सुरु करून कोपरगाव तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ व विक्री केंद्र उपलब्ध करून दिली असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री.संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले.

समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे, तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्वप्रथम आणून समताने पतसंस्था चळवळ देखील बँकांपेक्षा कमी नाही हे दाखवुन दिल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.जितुभाई  शहा यांनी सांगितले.

कर्ज वितरण करताना देखील समता पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल सारखी क्रास प्रणालीचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. नेटविन इंडिया सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली शुअर सेल, शुअर पेमेंट या प्रणाली मार्फत देखील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. असे समताचे सर व्यवस्थापक श्री.सचिन भट्टड म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे