सुधन गोल्ड लोन प्रस्तुत लिओ दांडिया रासला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सुधन गोल्ड लोन प्रस्तुत लिओ दांडिया रासला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव : नवरात्र उत्सवानिमित्त लायन्स, लिओ व लिनेस क्लब ऑफ कोपरगाव व सखी सर्कल वुमेन्स ग्रुप आयोजित सुधन गोल्ड लोन प्रस्तुत दांडिया रास या भव्य दिव्य स्पर्धा १९ ऑक्टोबर २०२४ रोजी शहरातील साई सिटी येथील भव्य हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेला कोपरगाव शहरातील गरबा व दांडिया प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः शिर्डी येथील साई आश्रयातील मुले व मुलांनीही या स्पर्धेत सहभागी होत मराठी हिंदी गीतांवर गरबा व दांडिया खेळत नृत्यातील वेगळेपण जपले.
साई आश्रया अनाथालयातील मुला मुलींसाठी सामजिक दायित्वातून सुधन परिवारातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला असून ही रक्कम १ लाख ५० हजार रुपये इतकी आहे – संदीप कोयटे, अध्यक्ष , सुधन गोल्ड लोन
या स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, ए डी सी सी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेत तुलसीदास खुबानी ज्वेलर्स कडून उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या ग्रुपला ११ हजार रुपये, उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या कपाला विसपुते सराफ यांच्याकडून ३ हजार रुपये, वैशाली ऑटोमोबाईल्स कडून उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या तीन महिलांना प्रत्येकी २ हजार १०० रुपये, उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या तीन पुरुषांना साई ज्योती पाइल्स हॉस्पिटल कडून २ हजार १०० रुपये, लहान मुलांमध्ये उत्कृष्ट कारभार नृत्य करणाऱ्या व उत्कृष्ट वेशभूषा असणाऱ्या मुलांना ५०० रुपये अशा प्रकारे रोख स्वरूपाची बक्षीसे देण्यात आली.
सन्मती फायनान्शिअल ग्रुप कडून उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या ग्रुपला ८ हजार रुपये, भारत एफ. आर. पी. कडून उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या प्रत्येकी तीन कपलला ३ हजार रुपये, उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या तीन महिलांना प्रत्येकी २ हजार १०० रुपये तर विमल फर्निचर कडून उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या पुरुषांना प्रत्येकी २ हजार १०० रुपये, जेडी बिल्डर्स अँड इंटेरियर कडून उत्कृष्ट थ्री पीस व गरबा रिल्स असे प्रत्येकी २ व्यक्तींना २ हजार १०० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
तपेश्वरी शर्मा यांच्या डी जेच्या विविध गीतांच्या तालावर, निनादात कोपरगाव शहरातील सहभागी स्पर्धकांनी मनमुराद आस्वाद घेतला. शिर्डी येथील साई आश्रया अनाथालयातील विद्यार्थ्यांनी विविध मराठी व हिंदी गीतांच्या तालावर सादर केलेले नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.लिओ दांडिया रास यशस्वीतेसाठी लायन्स, लिओ, लिनेस क्लब ऑफ कोपरगाव, सखी सर्कल वुमेन्स ग्रुपचे पदाधिकारी, सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.