कोपरगाव शहरात सखी सर्कल वुमेन्स ग्रुपचे उद्घाटन संपन्न – सौ.स्वाती कोयटे
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सखी सर्कल वुमेन्स ग्रुप समवेत उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुणे सौ.नेहा खरे व ग्रुप संस्थापिका सौ. स्वाती कोयटे
कोपरगाव शहरात सखी सर्कल वुमेन्स ग्रुपचे उद्घाटन संपन्न – सौ.स्वाती कोयटे
कोपरगाव : कुटुंबाच्या पलीकडे स्त्रीचे एक विश्व असते. त्या विश्वात ती स्वतःचे छंद जोपासून आनंदी राहावी. त्या विश्वातील संकल्पना समजून घेण्यासाठी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार सभागृहात ‘सखी सर्कल वुमेन्स ग्रुप’ चा उद्घाटन सोहळा नाशिक येथील सामाजिक व महिला चळवळीतील सौ.नेहा खरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
सखी सर्कलच्या माध्यमातून महिलांना कौटुंबिक जीवनाच्या पलीकडे असणाऱ्या विश्वाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व आनंदी जीवन शोधता येणार आहे. तसेच कोपरगाव शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी सखी सर्कलमुळे मिळणार आहे – सौ.चेतना लोंगाणी
अधिक माहिती देताना सखी सर्कल वुमेन्स ग्रुपच्या संस्थापिका सौ. स्वाती कोयटे म्हणाल्या की, सखी सर्कल वुमेन्स ग्रुप मध्ये सर्व महिला शिक्षित व सक्षम असून स्वतःचे छंद जोपासत स्वतः मधील कला गुणांना वाव देऊ शकतात. या सर्कलच्या माध्यमातून शहरातील महिलांचे मैत्रीपूर्ण नाते निर्माण होणार आहे. या नात्यांमधून सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडत शहरातील महिलांच्या व्यवसायातही वाढ होणार आहे. सखी सर्कल वुमेन्स ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून महिलांनी स्वतः मधील कला गुणांना वाव देऊन आत्मसात करावे आणि दुसऱ्यांनाही शिकवावे.
तर मनोगत व्यक्त करताना सौ. नेहा खरे म्हणाल्या की, कोपरगाव शहरात कोयटे परिवारातील सौ.स्वाती कोयटे आणि खुबाणी परिवारातील सौ.शालिनी खुबाणी व सौ. सिमरन खुबाणी यांच्या संकल्पनेतून शहरातील महिलांसाठी सखी सर्कल तयार करून शहरातील महिलांमध्ये असणाऱ्या गुणांना वाव देण्याचा व छंद जोपासण्याचा प्रयत्न केला असून हा स्तुत्य उपक्रम आहे. समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली सखी सर्कल वुमेन्स ग्रुपचा मजबूत प्लॅटफॉर्म तयार करावा.
कला गुण विकसित करण्याबरोबरच सामाजिक कार्य करत असताना कुटुंबाला, गावाला, देशाला अभिमान वाटावा असे काम करण्याची संधी सखी सर्कल मुळे मिळणार आहे – सौ.शितल चावला
या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.नेहा खरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच उपस्थित महिलांनी सखी सर्कलचे सदस्यत्व स्वीकारले. या सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रमुख पाहुण्या सौ.नेहा खरे यांचा सत्कार सौ.दिपा ठोळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सौ.सारिका भुतडा यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन करून दाखवून दिले की, महिला सुद्धा उत्कृष्ट सुत्रसंचालन करू शकतात.उपस्थितांचे आभार सौ.सायली शिंदे यांनी मानले.