समताच्या मुख्य कार्यालयास कोल्हापूर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताच्या मुख्य कार्यालयास कोल्हापूर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
कोपरगाव : महाराष्ट्रातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र राशिनकर, उपाध्यक्ष पंकज मेहता, संचालक जवाहर छाबडा, नरोत्तम लाटा, अरविंद कुलकर्णी, पंडित ढवळे, कृष्णात सातपुते, शांतीनाथ शिरगावे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पोवार, अंबप येथील विवेक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अतुल कुलकर्णी, वाडार येथील अयोध्या नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विश्वास मस्के, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी लेखापरीक्षक संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनचे विश्वस्त श्रीकांत चौगुले आदी पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.
या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग या राज्यातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक कार्य प्रणाली विषयी सविस्तर चर्चा केली तर जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी योगेश आसणे, कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे यांनी संस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्यप्रणाली आणि समता महिला बचत गटाच्या सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आणि पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.