सहकारी पतसंस्था खाजगी बँकांपेक्षाही सरस – काका कोयटे, चेअरमन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सहकारी पतसंस्था खाजगी बँकांपेक्षाही सरस – काका कोयटे, चेअरमन
नाशिक : सहकारी पतसंस्था खाजगी बँकांपेक्षाही सरस सोनेतारण व्यवसाय करू शकतात हे समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या नाशिक शहरातील पंचवटी शाखेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. या शाखेने ग्राहकाभिमुख सेवा देऊन हे यश मिळविले असल्याचे गौरवोद्गार समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
पंचवटी शाखेच्या वरिष्ठ अधिकारी सौ.अर्चना अंबादास सोनवणे
नाशिक शहरातील पंचवटी शाखेने १ वर्षात १२ कोटी रुपयांचा सोनेतारण कर्जाचा व्यवसाय पूर्ण केल्याबद्दल समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी पंचवटी शाखेला भेट दिली असता ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पंचवटी शाखेने १ वर्षात १२ कोटी रुपयांचा सोनेतारणाचा व्यवसाय पूर्ण केला आहे. विशेष बाब म्हणजे ही शाखा ज्या इमारतीत आहे त्या इमारतीत मथूट फायनान्स, नेड स्टार फायनान्स, एसबीएफसी फायनान्स, मॅग फिझर्व फायनान्स, आयएफएल फायनान्स, मनपुर्रम फायनान्स, येस बँक, फेड बँक फायनान्स, कोसमटट्म फायनान्स, आयसीआयसीआय बँक, कॅप्री फायनान्स अशा १५ च्या वर सोनेतारण व्यवसाय करणाऱ्या खाजगी कंपन्या व बँका याच इमारतीत व शेजारच्या इमारतीत असून देखील सोनेतारण कर्ज व्यवसायात चांगली ग्राहक सेवा देऊन या स्पर्धेत पंचवटी शाखेने आर्थिक प्रगती साधली आहे.
पंचवटी शाखेचे लिपिक फहीम अन्सारी
या वेळी पंचवटी शाखेच्या वरिष्ठ अधिकारी सौ.अर्चना अंबादास सोनवणे म्हणाल्या की, नाशिक शहरात विविध प्रकारच्या फायनान्स कंपन्या व सहकारी बँका आहे. परंतु मी व माझे सहकारी फहिम अन्सारी असे केवळ दोन कर्मचारी व सुधन गोल्ड लोनच्या प्रशिक्षणामुळे ग्राहकांना चांगली सेवा देऊन १२ कोटी रुपयांचा सोनेतारणाचा व्यवसाय करण्यात यश मिळविले आहे.