कोपरगावात पहिल्यांदाच माजी सैनिकांच्या वीर पत्नींचा सन्मान करत दिली सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कोपरगावात पहिल्यांदाच माजी सैनिकांच्या वीर पत्नींचा सन्मान करत दिली सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
कोपरगाव : विविध महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला संसाराचा गाडा सुरळीत चालवत आहे.काही महिला उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात गाव,तालुका,जिल्हा,देशाचे नेतृत्व करत आहे त्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान केला जातो, पण देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नी देखील पती सीमेवर देशाचे संरक्षण करत असताना घर,समाजात त्यांची महत्वाची भूमिका असते.त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे या महत्त्वपूर्ण विचारातून निवारा परिसरातील सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमाचे केलेले आयोजन कौतुकास्पद असून आम्ही देखील समता महिला बचत गटाच्या माध्यमातून कोपरगावातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.असे प्रतिपादन कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने निवारा मित्र मंडळ,श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ आणि साई निवारा मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख मार्गदर्शिका सौ.सुहासिनी कोयटे, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार,निवारा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ जोत्सना पटेल,उपाध्यक्षा सौ वैशाली जाधव यांच्या हस्ते कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिकांच्या वीर पत्नींचा सन्मान करून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देण्यात आली तसेच निवारा, सुभद्रानगर,ओमनगर,कोजागिरी कॉलनी, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी नगर,आढाव वस्ती,शंकर नगर परिसरातील कर्तृत्ववान महिला आणि श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ आयोजित श्रेष्ठ नागरिकांसाठी जलद चालणे स्पर्धेतील विजेत्यांचा ही सत्कार सत्कार २४ मार्च २०२२ रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आला.
प्रसंगी माजी सैनिकांच्या वीर पत्नींपैकी सौ रुख्मिणी युवराज गांगवे,सौ जयश्री रामनाथ वरपे, सौ कल्पना भाऊसाहेब निंबाळकर, श्रीमती सरला जाधव यांनी मनोगत व्यक्त करत कोयटे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार यांनी केले तर निवारा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ जोत्सना पटेल यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख मार्गदर्शिका सौ.सुहासिनी कोयटे, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार,निवारा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ जोत्सना पटेल,उपाध्यक्षा सौ वैशाली जाधव आणि माजी सैनिकांच्या वीर पत्नींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सौ सुनिता संतोष मुदबखे व सौ छाया रंगभाल यांनी स्वागत गीत गाऊन केली तसेच त्यांनी भारुड ही सादर केले.सौ नलिनी बुचके यांनी झाडूवालीच्या भूमिकेतून विनोदी नाटिका सादर केली.सौ कांचन नरोडे यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले तर ओम साबळे याने राष्ट्रभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.सौ वैशाली जाधव व सौ स्वाती इनामके यांनी कोरोना काळातील विनोदी गीत सादर केले.
समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनचे अध्यक्ष श्री युवराज गांगवे,असोसिएशनचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. निवारा,सुभद्रानगर,ओमनगर,कोजागिरी कॉलनी, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी नगर,आढाव वस्ती,शंकर नगर परिसरातील महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई निवारा मित्र मंडळ,श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ आणि निवारा महिला मंडळ आणि समता महिला बचत गटाचे पदाधिकारी आणि महिलांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सौ कांचन नरोडे व सौ आरती सोनवणे यांनी मानले.