कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने अन्नधान्य व खाद्यान्नावर लावलेल्या जीएसटीच्या निर्णयाविरोधात संबंधित विभागाला निवेदन – श्री सुधीर डागा,कार्याध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने अन्नधान्य व खाद्यान्नावर लावलेल्या जीएसटीच्या निर्णयाविरोधात संबंधित विभागाला निवेदन – श्री सुधीर डागा,कार्याध्यक्ष
कोपरगाव : भारत सरकारने अन्नधान्य व खाद्यान्न यावर ५% जीएसटी लावण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे देशभरात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा निर्णय व्यापारी बांधवांसह प्रत्येक नागरिकांवर अन्याय करणारा असा आहे.सरसकट सर्व अन्नधान्य व खाद्यान्नावर जीएसटी लागू केल्यास महागाई वाढणे, भ्रष्टाचार वाढणे असे दूरगामी परिणाम होऊ शकतात.या निर्णयामुळे व्यापारी बांधवांना व्यापार करणे अतिशय त्रासदायक होणार आहे.त्यामुळे या निर्णयाविरोधात देशभरात महागाई, भ्रष्टाचाराचा आगडोंब उसळेल. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा.या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरातील व्यापार बंद ठेवण्यात आला असून हा निर्णय मागे न घेतल्यास जीवनावश्यक वस्तूंसह सर्व व्यापार क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद करण्याचा इशारा देण्यात आला असून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने ही कोपरगाव तहसील कार्यालयातील संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा यांनी दिली.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने १६ जुलै २०२२ रोजी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,उपाध्यक्ष श्री राजकुमार बंब,कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा,खजिनदार श्री तुलसीदास खुबानी,श्री नारायण अग्रवाल, श्री गुलशन होडे, श्री सत्येन मुंदडा श्री किरण शिरोडे,शितलकुमार शिंगी,संतोष मुंदडा,निलेश मुंदडा,महावीर सोनी,संतोष भुसारे,सुनिल काले,पवन डागा आदींसह कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सदस्य,शाखा प्रतिनिधींच्या उपस्थितीत कोपरगाव तहसील कार्यालयातील संबंधित विभागातील सिनियर लिपिक श्री चंद्रशेखर कुलथे यांना निवेदन देण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, यामुळे जनतेला आर्थिक भुर्दंड बसणार आहे.व्यापारी बांधवांना क्लेरीकल कामाचा अधिक ताण पडणे व संबंधित विभागांत कारवाईच्या नावाखाली भ्रष्टाचार वाढणे असे अनेक दुष्परिणाम संभवतात .या बाबत आपल्या देशभरातील शिखर संघटना,व्यापारी संघटना केंद्र व राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे.या निर्णयविरोधात कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी एकत्रित येऊन संबंधित विभागाला निवेदन देऊन याची जाणीव करून दिली आहे.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सदस्य व व्यापारी श्री नारायण अग्रवाल म्हणाले की,आम्ही व्यापाऱ्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या विरोधात निवेदने ,आंदोलने करून ती सोडवत असतो, केंद्र व राज्य सरकारने अन्नधान्य व खाद्यान्न यावर लावलेल्या जीएसटीचा निर्णय रद्द करण्यात यावा. यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदन दिले असून केंद्र सरकारने यावर योग्य तो निर्णय घेत त्वरित रद्द करावा.
निवेदनपर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा यांनी केले,तर उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष श्री राजकुमार बंब यांनी मानले.